पुणे : मुख्यमंत्र्यांच्या नावाने राज्याच्या ग्रामीण भागासाठी एक स्वतंत्र पाणी योजना मंजूर होईल, असे आश्वासन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.स्वच्छ भारत मिशन(ग्रामीण) अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय आत्मसन्मान कार्यशाळा पुण्यात बालेवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना लोणीकर यांनी आश्वासन दिले. आराखडा बनवून राज्याने स्वत:ची मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजना तयार केली आहे. त्याचे सादरीकरणही केले आहे. त्यासाठी १ हजार कोटी मागितले आहेत. त्याला तत्त्वत: मंजुरीही मिळाली आहे. पुरवणी बजेटमध्ये त्याला निधी मिळेल. त्यानंतर लवकरच राज्याची ही योजना कार्यान्वीत होईल. वेळप्रसंगी केंद्राकडून पैसा आणू, पण सर्वांनी पाणी देऊ, असे आश्वासनही लोणीकर यांनी दिले.