इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय; 30 सप्टेंबरपर्यंत जागावाटप ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 04:48 PM2023-09-01T16:48:04+5:302023-09-01T16:48:40+5:30

I.N.D.I.A Meeting: विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली. यात 13 सदस्यीय समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

I.N.D.I.A Meeting: Many Decisions in India alliance's Mumbai Meeting; Allotment of seats will be done by September 30 | इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय; 30 सप्टेंबरपर्यंत जागावाटप ठरणार

इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय; 30 सप्टेंबरपर्यंत जागावाटप ठरणार

googlenewsNext

I.N.D.I.A Meeting: विरोधकांच्या  I.N.D.I.A आघाडीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत शुक्रवारी मोठा निर्णय घेण्यात आला. यावेळी 13 सदस्यीय समन्वय समितीची घोषणा करण्यात आली आहे. या पॅनेलमध्ये केसी वेणुगोपाल, शरद पवार, एमके स्टॅलिन, संजय राऊत, तेजस्वी यादव, अभिषेक बॅनर्जी, राघव चढ्ढा, जावेद खान, लल्लन सिंग, हेमंत सोरेन, डी राजा, ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांचा समावेश आहे. ही समिती येत्या 30 सप्टेंबरपर्यंत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणार आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यावेळी म्हणाले की, आमच्या दोन्ही बैठका यशस्वी ठरल्या. कारण, आमच्या बैठकांनंतर पंतप्रधानांनी त्यांच्या त्यानंतरच्या भाषणात केवळ भारतावर टीका केली नाही, तर आपल्या प्रिय देशाचाही अपमान केला आहे. त्यांनी चक्क दहशतवादी संघटनेशी तुलना केली. या सरकारच्या सूडाच्या राजकारणामुळे येत्या काही महिन्यांत आणखी हल्ले, आणखी छापे आणि अटकेसाठी आपण तयार असले पाहिजे.

खर्गे पुढे म्हणाले, आमची आघाडी जितकी मोठी होईल, तितका भाजप सरकार आमच्या नेत्यांविरोधात एजन्सीचा दुरुपयोग करेल. महाराष्ट्र, राजस्थान आणि बंगालमध्येही त्यांनी असेच केले. गेल्या आठवड्यात झारखंड आणि छत्तीसगडमध्ये ही कारवाई करण्यात आली. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला राज्यांवर नियंत्रण ठेवायचे आहे. राज्यांना कर महसुलातील त्यांच्या वाट्यापासून वंचित ठेवले जात आहे. विरोधी शासित राज्यांना मनरेगाची थकबाकी दिली जात नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

'जुडेगा भारत, जीतेगा इंडिया'
I.N.D.I.A. कडून सर्व प्रकारचा संवाद आणि माध्यमांसंदर्भातील रणनीती, तसेच कॅम्पेनची थीम वेगवेगळ्या भाषांमध्ये असेल. ही थीम "जुडेगा भारत, जीतेगा इंडिया", अशी असेल. हेही या बैठकीत निश्चित करण्यात आले. लवकरच देशाच्या विविध भागांमध्ये संयुक्त रॅलीचे आयोजन केले जाईल. सार्वजनिक प्रश्नांवर या रॅली केल्या जातील. याशिवाय, विविध राज्यांमध्ये जागा वाटपाची प्रक्रियाही लवकरच सुरू होईल. ही प्रक्रिया गिव्ह अँड टेक भावनेने पूर्ण केली जाईल. तसेच, आगामी लोकसभानिवडणूक सर्व पक्ष एकत्रितपणे लढतील, असा निर्ययही या I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला.

Web Title: I.N.D.I.A Meeting: Many Decisions in India alliance's Mumbai Meeting; Allotment of seats will be done by September 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.