नागपूर : देशाच्या सीमेवर भाषा, धर्म, पंथ यांना भेदून सैनिक आपल्या जीव धोक्यात घालून देशाचे व समाजाचे रक्षण करीत आहेत. सैनिकांची ही भावना विश्वमांगल्याची आहे. परंतु समाजानेही सैनिकांचे समर्पण लक्षात घेतले पाहिजे. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती समाजात सन्मानाची भावना रुजविण्याचे काम झाल्यास, भारत विश्वमांगल्याची राजधानी होईल, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली.देशरक्षक आणि धर्मरक्षक यांच्या प्रेरणा संगमातून राष्ट्रक्रांतीचे बीजारोपण करणारा प्रेरणा संगम हा कार्यक्रम धर्मसंस्कृती महाकुंभात आयोजित केला होता. सैनिकांच्या कुटुंबीयांप्रती आदर व्यक्त करण्यास एक प्रेरणादायी संदेश कार्यक्रमातून देण्यात आला. ज्योतिषपिठाधीश्वर शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सरसंघचालक मोहन भागवत होते. त्याचबरोबर सेनेचे जनरल अॅडमिरल निर्मलचंद वीज, लेफ्टनन्ट जनरल सय्यद अता होस्नेन, हवाई दलाचे एअर मार्शल भूषण गोखले, लेफ्ट. कर्नल जी.एस. जॉली, लेफ्ट. कर्नल सुनील देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात १५० वीरपत्नी, वीरमातांचा सत्कार तसेच विशेष पदक प्राप्त अधिकारी आणि शौर्य गाजविलेल्या सैनिकांचा गौरव या करण्यात आला. (प्रतिनिधी)सीमेवर बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांना सन्मान, सुविधा मिळावी, सैनिकांचा आदर देश व समाजाने कायम ठेवावा. समाजाची सैनिकांप्रती कर्तव्याची भावना असल्याची जाणीव व्हावी, अशी समाज व सरकारकडून अपेक्षा आहे. - जनरल अॅडमिरल निर्मलचंद वीजमहाराष्ट्रात गेल्या वर्षात ८५०० भागवत कथा संपन्न झाल्या. यात कथाकार व आयोजकांचा सन्मान झाला. परंतु ज्या परिसरात हे आयोजन झाले, त्या परिसरातील सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान झाला असता, तर एक मोठे कार्य घडले असते. ही भावना समाजात निर्माण होणे गरजेचे आहे.- आचार्य जितेंद्रनाथ महाराजसंत व सैनिक दोन्ही संन्यासी आहेत. दोघेही देशाचे संरक्षक आहे. त्यामुळे संत आणि सैनिकांबद्दल समाजामध्ये आदराची भावना असणे गरजेचे आहे. विश्वमांगल्याच्या भावनेतून हे कार्य घराघरात पोहचविण्याचे कार्य संत संप्रदायाबरोबरच आता स्वयंसेवकांनीही हाती घेतले आहे. - ज्योतिषपीठाधीश्वर शंकराचार्यस्वामी वासुदेवानंद सरस्वती
भारत विश्वमांगल्याची राजधानी व्हावी
By admin | Published: December 25, 2016 1:24 AM