ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 14 : भारत मोठा होण्यासाठी तो मुळात भारत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. जगविख्यात चित्रकार वासुदेव कामत यांच्या षट्यब्दीपूर्ती सोहळ््याप्रसंगी ते बोलत होते. बोरीवलीच्या जनसेवा केंद्रात हा सोहळा रंगला. भागवत पुढे म्हणाले, व्यक्ती, समाज आणि सृष्टी या तिन्ही सत्ता पुढे गेल्या तर त्यात सर्वांचे सुख आहे. त्यासाठीचे गुण आपल्यात आहेत. कर्तव्य कर्म आपण पार पाडत असतो. त्यामुळे ईश्वराची पूजा केल्याप्रमाणे आपण जगतो. भारत मोठा होईल, असे आपण गौरवाने म्हणतो. तसेच सगळ्या जगालाही आपण मोठे झाले पाहिजे असेच वाटते. मात्र भारत मोठा व्हावा, असे वाटत असेल तर तो मुळात ह्यभारतह्ण राहणे गरजेचे आहे. त्यासाठी आपली संस्कृती जपणे महत्वाचे आहे. त्यासाठी वासुदेव कामत यांच्यासारखी उदाहरणे समाजासमोर यायली हवीत, असे म्हणत कामत यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. कामत यांनी त्यांची कला समाजासाठी खर्ची घालत सत्यम, शिवम आणि सुंदरमचे दर्शन घडविले आहे. कलाकार कलेचा आस्वाद स्वत: घेतो तसेच सामान्य माणसाना देखील तो घेता येतो, असेही ते म्हणाले. यावेळी मानपत्र देऊन कामत यांचा सपत्नीक डॉ भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला...कलेतून आनंद आणि समाधानमी कलेवर भरभरून प्रेम केले, त्यामुळे असा सत्कार सोहळा कलाकाराला कधीच अपेक्षित नसतो. कलावंताला खरा आनंद तेव्हाच मिळतो, जेव्हा त्याची कलाकृती एखाद्या सामान्य घराच्या भिंतीवर आरूढ होते, अशा शब्दांत वासुदेव कामत यांनी सत्काराला उत्तर दिले. सत्कारप्रसंगी प्रोत्साहन देणाऱ्यांची आठवण येते. शिवाय वडीलांचे दोन प्रश्नही आठवतात. सकाळी आज तू कोणते चित्र काढले? आणि संध्याकाळी शाखेत गेला होतास का? त्यातून संस्कारांचे वळण लागले. कला आपल्याला अंतर्मुख करते. त्यातूनच आनंद आणि समधान मिळतेह्ण, असेही कामत म्हणाले.
भारत मोठा होण्यासाठी तो भारत राहिला पाहिजे - मोहन भागवत
By admin | Published: April 14, 2017 10:17 PM