नागपूर : आगामी २० वर्षांत भारत धर्मनिरपेक्षतेच्या चौकटीतून बाहेर पडून हिंदू राष्ट्र होईल, असा दावा स्वामी चिन्मयानंद सरस्वती (हरिद्वार) यांनी रविवारी येथे केला.विश्व हिंदू परिषदेच्या हिंदू संमेलनानिमित्त ते नागपूरमध्ये आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, देशात सत्तांतर झाल्यानंतर देशभर फिरताना ठिकठिकाणी हिंदूंमध्ये उत्साह दिसून आला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे भारतातच नव्हे तर त्यांना विरोध करणाऱ्या राष्ट्रांमध्ये त्यांचे स्वागत झाले. ज्या अमेरिकेने त्यांना तेथे येण्यास विरोध केला होता, त्या अमेरिकेने त्यांचे स्वागत केले. हे सरकार असेच चालले तर पुढच्या २० वर्षांत भारत हा हिंदू राष्ट्र म्हणून ओळखला जाईल. भारत हा मुळातच हिंदू राष्ट्र आहे. सामाजिकदृष्ट्या तो हिंदू राष्ट्र म्हणून ओळखला जावा यासाठी धर्मनिरपेक्षतेच्या चौकटीतून बाहेर पडणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
२० वर्षांत भारत हिंदू राष्ट्र होईल!
By admin | Published: January 12, 2015 3:13 AM