ऑनलाइन लोकमत
कोल्हापुर, दि. २६ : विदेशातील मोठे उद्योग भारतात येत असून, येत्या कांही वर्षातच भारत जागातील उत्पादनाची फॅक्टरी बनेल , असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या स्मॅक भवन उद्घाटन सोहळ्या प्रसंगी बोलताना केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले गेल्या तीस वर्षांत शेजारच्या चिन देश जगातील उत्पादनाची फॅक्टरी म्हणून ओळखले जात होते, पण येत्या काही वर्षांतच भारत चिनला मागे टाकून निश्चितच जागतीक उत्पादनाची फॅक्टरी बनेल, जगभरात मोठ्या प्रमाणावर मंदी आहे, आणि भारताचा आर्थिक विकास दर 7.6 % इतका आहे, आणखी तो वाढणार आहे, त्यामुळे संपूर्ण जगभरातील मोठ्या उद्योगांचे लक्ष आता भारताकडे आहे, अनेक मोठे उद्योग भारतात आले आहेत, तर बरेच येण्याच्या तयारीतआहेत, भारताची 65% लोकसंख्या 35% च्या आतील आहे, त्यामुळे भारताकडे ग्लोबलायजेशन करण्यासाठी युवा पिढी आहे, .
कोल्हापूरच्या उद्योगां बाबत बोलताना म्हणाले येथील उद्योगाची मुहूर्त मेढ छत्रपती शाहू महाराजांनी रोवली आहे, शेती, उद्योग, व्यापारामुळे कोल्हापूर जिल्हा राज्यात आग्रगण्य म्हणून ओळखला जातो, उद्योग वाढायचा असेल तर त्याठिकाणी विमान सेवा उपलब्ध असली पाहिजे, केंद्र सरकारच्या नव्या योजनेतून कोल्हापूरची विमान सेवेचा मार्ग मोकळा झाला आहे, लवकर विमान सेवा सुरू होईल , तर कोल्हापूर हे फौंड्री हब म्हणून ओळखले जाते, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर फौंड्री उद्योग आहे, आधुनिक फौंड्री हबसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत प्रस्ताव पाठवा राज्य शासन तो मंजूर करेल . वीज दरवाढीबाबत बोलताना त्यांनी राज्यातील शेतकर्यांना विजेच्या दरात सुट दिली जाणार आहे, तर एक लाख सत्तर हजार शेतकर्यांना नवीन कनेक्शन दिली आहेत, त्यामुळे हा बोजा उद्योजकांवर पडला आहे, पण लवकरच उद्योगांचा विज दर ही काही प्रमाणात कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, डी झोन मधील उद्योगांचा वीज दर कमी होणारच आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योजकांना आश्वासन दिले.
यावेळी स्मॅक भवनसाठी 41 लाख रुपयांची देणगी दिल्या बद्दल जेष्ठ उद्योजक श्री रामप्रताप झंवर , तसेच 25 लाख रुपयांची देणगी दिल्या बद्दल उद्योजक सचिन शिरगांवकर , यांच्यासह जेष्ठ उद्योजक तुकाराम पाटील, के. रवीकुमार , आशा जैन, आनंदराव पाटील, सचिन पाटील,शिरीष सप्रे, सुनिल जानवाडकर , नेमचंद संघवी, पांडुरंग बुधले , प्रकाश राठोड, महेंद्र राठोड, दीपक परांडेकर यांना मुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
1)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मॅक भवनचे उद्घाटन केल्यानंतर संपूर्ण वस्तूची पहाणी केली ,ही वास्तू पंचगंगा नदी किनारी बांधल्याने नदी आणि संपूर्ण परिसर हिरवागार, निसर्गाने नटलेला नयनरम्य दिसतो, हे पाहून मुख्यमंत्र्यानी ही वास्तू पाहून मंत्रालया ऐवजी एक दिवस इथूनच राज्याचा कारभार चालवावा इतकी सुंदर वास्तू आणि परिसर आहे असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
2) राजकीय आखाडा रंगला -स्मॅक भवनच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्याच्या ओगोदर शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी ,आमदार सदाभाऊ खोत , आमदार सतेज पाटील, चंद्रदिप नरके, सुजित मिणचेकर , आले होते, मुख्यमंत्री येईपर्यंत यांच्या गप्पा रंगल्या होत्या, यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख भगवानराव काटे यांनी सतेज पाटील यांना आपण दाढी वाढवायला आपण काहीतरी "पण" केला आहे , यावर सदाभाऊ खोत यांनी बळीच राज्य येऊदे म्हणून दाढी वाढवली आहे, असे म्हणताच हस्याचे फवारे उडाले ,तर सतेज पाटील यांनी स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांना संबोधून जैन साहेब आमच्या आघाडीच्या काळात उद्योजक बरेच प्रश्न घेऊन भांडत होते, आत्ता सुद्धा मुख्यमंत्र्याना कोल्हापूरचे विमानतळ , मुंबई बंगळूर कॉरीडोर , विज दरवाढ या बाबत सांगा असे म्हणताच पुन्हा हस्याचे फवारे उडाले सर्व पक्षाचे लोकप्रतिनीधी एकत्र आल्याने जोरदार राजकीय आखाडा रंगला होता