शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

‘याच पिढीत भारताला प्रगत राष्ट्र बनविणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2016 2:10 AM

याच पिढीमध्ये भारताला प्रगत राष्ट्र बनविणे हे आपल्या सरकारचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रायगड जिल्ह्यातील

पनवेल (रायगड) : याच पिढीमध्ये भारताला प्रगत राष्ट्र बनविणे हे आपल्या सरकारचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा येथे केले. पंतप्रधानांच्या हस्ते खालापूर तालुक्यातील पाताळगंगा औद्योगिक वसाहत परिसरामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ सिक्युरिटी मार्केटचे (सेबी-एनआयएसएम) उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. देशाची अर्थव्यवस्था जलद गतीने वाढत असून, मोठ्या प्रमाणावर ती विस्तारत आहे. आर्थिक वृत्तपत्र वाचताना आता समाधानकारक चित्र दिसते. मी नव्या उद्योजकांच्या यशोगाथा वाचतो तेव्हा स्टार्टअपचा उपक्रम यशस्वी होत असल्याचे समाधान मिळते, असे पंतप्रधान म्हणाले.स्कील इंडियाच्या माध्यमातून देशातील उत्पादकता वाढविण्यासाठी युवकांची क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगून मोदी म्हणाले, तरुणांना कौशल्यशिक्षण देणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आव्हान स्वीकारण्यास ते तयार असले पाहिजेत. तसेच जनहितार्थ तयार करण्यात आलेल्या प्रोजेक्टसाठी बाजारातून भांडवल उभे केले पाहिजे, असे मत मोदींनी व्यक्त केले.यशाचे मोजमाप करायचे असेल तर दलाल स्ट्रीटवर नव्हे, तर गावांमध्ये किती प्रभाव पडला हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे सांगून मोदी म्हणाले, आर्थिक बाजारपेठेच्या शिक्षणामध्ये एनआयएसएम महत्त्वपूर्ण कामगिरी करत आहे. मात्र भांडवली गुंतवणुकीपासून सामान्य जनता दूर आहे; त्यांना या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्याचबरोबर दूरदर्शी पायाभूत सुविधांवर भांडवली बाजारातील पैसा खर्च व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले.मजबूत आणि निर्माणक्षम अर्थव्यवस्थेसाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला. देशहितासाठी जे जे निर्णय कठोरपणे घ्यावे लागतील ते ते घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या वेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, सेबीचे चेअरमन यू.के. सिन्हा तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय सुरक्षा यंत्रणांचे पदाधिकारी, सेबीचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)एनआयएसएमचे होणार विद्यापीठयेत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एनआयएसएमचे विद्यापीठ करण्याचा प्रस्ताव घेऊ, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.