शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

भारतीय अंडीभक्षक सापांचे विदर्भात अस्तित्व

By admin | Published: April 24, 2016 2:35 AM

दुर्मिळ समजला जाणारा भारतीय अंडीभक्षक साप जगातून नष्ट झाला, असे मानण्यात येत होते; परंतु वर्धेतील सर्पमित्र पराग दांडगे यांनी या सापाचे विदर्भात अस्तित्त्व असल्याचा

वर्धा : दुर्मिळ समजला जाणारा भारतीय अंडीभक्षक साप जगातून नष्ट झाला, असे मानण्यात येत होते; परंतु वर्धेतील सर्पमित्र पराग दांडगे यांनी या सापाचे विदर्भात अस्तित्त्व असल्याचा शोधनिबंध १४ एप्रिल २०१६ रोजी ‘रशियन जर्नल आॅफ हर्पेटोलॉजी’ या शोधपत्रिकेत सादर केला. भारतीय अंडीभक्षक सापाचा वावर महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये असून यातील आठ जिल्हे विदर्भातील असल्याचे त्यांनी शोधनिबंधात सप्रमाण सिद्ध केले आहे. १०० वर्षांहून अधिक काळापूर्वी अस्तित्त्वात असलेल्या या अंडीभक्षक सापाचा वर्धा येथीलपराग दांडगे यांनी २००३ साली पुनर्शोध लावला. एवढेच नव्हे तर या नष्टप्राय सापाचे अस्तित्व विदर्भात असल्याचे सांगत विदर्भ हा भारतीय अंडीमक्षक सापांचा महत्त्वाचा आधिवास असल्याचेही सिद्ध केले आहे. यासंदर्भातील शोध निबंध पराग दांडगे आणि आशिष टिपले या दोघांनी तयार केला होता. त्यांच्या या शोधनिबंधाला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे. भारतीय अंडीभक्षक साप हा फक्त बया, मुनिया, सामान्य चिमणी, पारवा, होला अशा काही नेमक्या पक्ष्यांची अंडी खातो. त्याच्याअंडी गिळण्याच्या विशिष्ट पद्धतीचा अभ्यास करून निसर्गातीलया पक्ष्यांच्या संख्येवर नियंत्रणठेऊन किती महत्त्वाचे कार्यकरतोय, याविषयीचा दांडगे यांचा शोधनिबंध २००८ मध्ये ‘हम्याद्र्याद’ नावाच्या शोधपत्रिकेत प्रकाशित झाला होता. नव्याने १४ एप्रिल २०१६ रोजी प्रसिध्द झालेल्या शोधनिबंधात दांडगे व टिपले यांनी अंडीभक्षक सापाबद्दलची नवीन काही तथ्ये मांडली आहेत. दांडगे यांनी अभ्यासलेल्या ६६ अंडीभक्षक सापांपैकी ४० साप रस्त्यांवर वाहनाखाली चिरडून ठार झाल्याची नोंद केलीआहे. (प्रतिनिधी) वाघाच्या सूचीतयेणारा वन्यजीव भारतीय अंडीभक्षक साप केवळ पक्ष्यांची अंडी खाऊनच आपली उपजीविका चालवितो. हा साप वन्यजीव संवर्धन अधिनियम १९७२ नुसार अनुसूची-१ म्हणजेच वाघ असलेल्या सूचीमध्ये समाविष्ट आहे.अंडीभक्षक साप नामशेष होण्याची भीतीविदर्भ हा भारतीय अंडीभक्षक सापाचा महत्त्वाचा अधिवास असून विदर्भातील शेकडो एकर झुडपी जंगले आज अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. झुडपी जंगले संपुष्टात येत असल्यानेच पक्ष्यांचे अधिवास संपुष्टात येत आहे. त्यांच्या अंड्यांवर गुजराण करणारा अंडीभक्षक साप पुन्हा एकदा काळाच्या पडद्याआड जाण्याची चिन्हे दिसत आहेत. या अनोख्या व विशेष सापाच्या संवर्धनाची व अध्ययनाची गरज आहे. सर्वत्र व्याघ्र संरक्षण व संवर्धनाला ऊत आला आहे. असे असताना या सरीसृपांकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यांच्या सवर्धनाकरिता कोणीच पुढे येत नाही, याचीच खंत.- पराग दांडगे, बहार नेचर फाउंडेशन, वर्धा