जयंत धुळप
अलिबाद, दि. २२ - सन १९२६ मध्ये स्पेन मधील बार्सिलोना येथे जन्म झालेले आणि गेली ६० वर्षे आपल्या समाजकार्याच्या निमीत्ताने भारत हीच आपली कर्मभूमी मानणारे ख्रिश्चन धर्मगुरु फेडरिको सोपेना गुसी यांना त्यांच्या इच्छेनुसार अखेर ९० व्या वर्षी ‘भारतीय नागरिकत्व’ गुरुवारी प्राप्त झाले. त्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला.
गुरुवारी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांच्यासमोर भारतीयत्वाची शपथ त्यांना देण्यात आली. शपथविधीनंतर त्यांना भारतीयत्वाचे प्रमाणपत्र प्रदान करताच ते सुखावून गेल्यांचे त्यांच्या या भारतीयत्वाच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी पाठपूरावा करणा-या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
सन १९४९ मध्ये आपल्या समाजकार्याच्या हेतूने भारतात आलेले सोपेना जन्माने ख्रिश्चन आहेत. गेली अनेक वर्षे रायगड मधील कातकरी-आदिवासीं या मागास समाजाकरीता काम करित असलेले सोपेना या आदिवासीच्या वाडीवस्तीवर सोपेना बाबा म्हणून ओळखले जातात.
हिंदी व मराठी भाषां अस्खलीत बोलणा:या सोपेना यांचा धर्मनिरपेक्षता तत्वावर ठाम विश्वास आहे. आणि त्यामूळेच ते सर्वधर्मीमध्ये पोहोचू शकले. चारधामा यांत्र करुन त्यांनी हिन्दू संस्कृतीचा अभ्यास केला तर भारतमाता की जय हे त्यांनी आपल्या आयुष्याचेच ब्रीद करुन टाकले.
तत्वज्ञान, मानसशास्त्र, भाषा आणि विविध धर्माचा अभ्यास असलेल्या सोपेना यांनी सन 1978 मध्ये भारतीयत्वासाठी प्रथम अर्ज केला होता. परंतू त्याची फारशी दखल शासन स्तरावर घेण्यात आली नाही. सन २०११ र्पयत त्यांनी एकुण तीन वेळा अर्ज केला, परंतु यंश आले नाही. अखेर मी स्पॅनिश म्हणून जन्मलो असलो तरी मरणार मात्र भारतीय म्हणूनच अशा धेय्याने प्रेरीत सोपेना यांची भेट आदिवासीं बांधवांकरीता रायगड मध्ये कार्यरत सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांच्याशी झाली.
आणि त्याच्या इच्छापूर्तीच्या प्रयत्नांना नवीगती प्राप्त झाली. वैशाली पाटील यांनी सोपेना यांची सर्व संबंधीत कागदपत्रे, प्रमाणपत्रे संकलीत केली. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे आणि वैशाली पाटील यांनी दिल्लीतील भारतीय नागरिकत्व संचालनालयार्पयत नेटाने पाठपुरावा केल्यानंतर सोपेना यांना भारताचे ‘विशेष’ नागरिकत्व बहाल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
गुरुवारी मुंबईत या निर्णयाची प्रत्यक्ष अमंलबजावणी होवून, स्पॅनीश फेडरिको सोपेना गुसी हे भारतीय होवून भारत ही त्यांची ‘कर्मभूमी’ वयाच्या नव्वदीत ‘मातृभूमी’ झाली.