शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्याला अटक

By admin | Published: April 27, 2016 6:21 AM

२०११ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी इंडियन मुजाहिद्दीनचा जैनुल अबिदिन (२६) या अतिरेक्यास मंगळवारी पहाटे एटीएसने येथे विमानतळावर अटक केली.

मुंबई : मुंबईत २०११ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी इंडियन मुजाहिद्दीनचा जैनुल अबिदिन (२६) या अतिरेक्यास मंगळवारी पहाटे एटीएसने येथे विमानतळावर अटक केली. या तिहेरी बॉम्बस्फोटात त्याने स्फोटके वितरित केली होती. दरम्यान, न्यायालयाने त्यास ६ मेपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जैनुल अबिदिन हा २०११ नंतर फरार होता. गतवर्षी आॅक्टोबरमध्ये त्याला कथितरीत्या सौदी अरेबियात ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले जाते. मुंबईत २०११ मध्ये हे तीन भीषण बॉम्बस्फोट झाले होते. आॅपेरा हाऊस, झवेरी बाजार आणि दादर परिसरात सायंकाळी ६.५४ ते ७.०६ च्या दरम्यान स्फोट झाले होते. यात २७ जण ठार, तर १२० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेला अबिदिन हा बारावा आरोपी आहे. यासीन भटकळला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे, तर आणखी सात जण वाँटेड आहेत. एटीएसचे आयजी (पोलीस महानिरीक्षक) निकेत कौशिक यांनी सांगितले की, अबिदिनविरुद्ध २०१५ मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास त्यास मुंबईत विमानतळावर अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून या पूर्ण कटकारस्थानाची माहिती उघड होऊ शकते. यासीन भटकळ आणि त्याचे साथीदार वकार व तबरेज यांनी बॉम्ब पेरले होते. दरम्यान, मंगलोरमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणात अबिदिननेच आरडीएक्स पुरविले होते. गतवर्षी मार्चमध्ये बंगळुरूतून डॉ. सय्यद इस्माईल अफाक यास अटक करण्यात आली होती. स्फोटापूर्वी हा रियाज भटकळच्या संपर्कात होता. स्फोटके यासीनच्या एका सहकाऱ्याकडे (वकास) देण्याबाबत त्याने विचारणा केली होती. त्यानुसार अफाकने स्फोटके मिळविली आणि ती अबिदिनकडे दिली. त्याने ती वकासकडे देण्याचे ठरले, असे सूत्रांनी सांगितले. अबिदिन हा मूळचा कर्नाटकातील भटकळच्या गावचा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाजनेच अबिदिनला इंडियन मुजाहिद्दीनमध्ये आणले होते. देशात इंडियन मुजाहिद्दीनकडून करण्यात आलेल्या बहुतांश स्फोटांत अबिदिन यानेच स्फोटकांचा पुरवठा केला होता.