मुंबई : भारतीय पद्धतीची शौचालये असल्यास त्यांच्या स्वच्छतेसाठी पाश्चात्य पद्धतीच्या शौचालयांपेक्षा कमी पाणी लागत असते. त्याचप्रमाणे, घरातील कामे करण्यामध्ये पुरुषांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे. ‘लोकमत’च्या टीमने राज्याच्या विविध भागांमध्ये भेटी देऊन शौचालये व स्नानगृह, तसेच त्यांच्या स्वच्छतेबाबत केलेल्या सर्वेक्षणातून वरील बाबी निदर्शनास आल्या आहेत. घरातील स्वच्छतागृहांची स्वच्छता स्वत: करणाऱ्यांचे प्रमाण मोठे असून, कामगारांकडून होणाºया स्वच्छतेचे प्रमाण सुमारे १० टक्के आहे.भारतीय पुरुषांचा घरगुती कामांमधील सहभाग आता वाढू लागला आहे. या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी ३५ टक्के व्यक्तिंनी स्वत: स्वच्छतागृहांची साफसफाई करीत असल्याचे सांगितले.
यामधील पुरूषांचे प्रमाण २६ टक्के तर महिलांचे ४९ टक्के आहे. स्वत: अथवा इतरांकडून होणारी स्वच्छता ३२ टक्के घरात आढळून आली. यामध्ये पुरुषांचे प्रमाण ३५ तर महिला २८ टक्के असतात. १० टक्के घरांमध्ये जोडीदार सफाईचे काम करीत असून, यामध्ये १२ टक्के पुरुष तर ६ टक्के महिला आढळून आल्या. सहभागी झालेल्यांपैकी १४ टक्के कुटुंबातील अन्य सदस्य स्वच्छता करीत असतात. यामध्ये १८ टक्के पुरुष तर ९ टक्के महिला आहेत. ९ टक्के घरांमध्ये कामगारांकडून स्वच्छतेचे काम केले जाते. त्यामध्ये ९ टक्के पुरुष कामगार, तर ८ टक्के महिला असल्याचेही सर्वेक्षणातून पुढे आले आहे. स्वच्छतागृहांच्या साफसफाईसाठी आजही २६ टक्के व्यक्ति अॅसिडचा तर १२ टक्के व्यक्ती कपडे धुण्याच्या पावडरचा वापर करीत असतात. स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी योग्य ते प्रॉडक्ट वापरण्यासाठी लोकांना शिक्षण देण्याची मोठी गरज यामधून स्पष्ट होत आहे.स्वच्छतागृहांसाठी किती वापरले जाते पाणी ?पाश्चिमात्य शौचालयांपेक्षा भारतीय पद्धतीच्या शौचालयांच्या स्वच्छतेसाठी पाणी कमी लागत असल्याचे अनेकांना वाटते.69%व्यक्तिंनी पाणीबचतीला प्राथमिकतादेत असल्याचेसांगितले.29%लोकांनी पाणीबचतही महत्त्वाची बाब असल्याचे मान्य केले आहे.महाराष्ट्रात हार्पिक सर्वात लोकप्रिय