विलास जळकोटकर
सोलापूर: अत्यल्प पर्जन्यमान... वाढते तापमान अन् यामुळे निर्माण होणाºया विदारक स्थिीतील ‘तुम्ही आम्ही सर्वजण’ जबाबदार आहोत या जाणिवेतून सुरु झालेल्या हरित वसुंधरा फाउंडेशनने गेल्या तीन वर्षांपासून शहरात, परिसरात, जिल्ह्यात देशी रोपांची लागवड अन् संगोपनाचे कार्य आरंभिले आहे. गेल्या अडीच वर्षात या फाउंडेशनने विनामूल्य २५०० ठिकाणी वृक्षारोपण करु न ती जगवताना पर्यावण संवर्धनासाठी प्रयत्न चालवला आहे.
१५ आॅगस्ट २०१६ साली छोटसं जांभळाचा रोपटं लाऊन अमित बनसोडे यांच्यासह त्यांंच्या मित्रपरिवानानं हरित वसुंधरा फाउंडेशनचा श्रीगणेशा केला. पर्यावरणासाठी उपयुक्त अशा देशी झाडांचे वृक्षारोपण करुन ती जपण्यासाठी हा उपक्रम चालवला आहे. वृक्षारोपणासाठी कोणत्याही प्रकारचे मूल्य न आकारता लागणारी रोपं, साहित्य, खड्डे हा संपूर्ण खर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून केला जात असल्याचे सांगण्यात आले.
आजवर शिवाजीनगर (गुलमोहर सोसायटी), कुमठा नाका सोलगी नगर), विजापूर रोड (जवान नगर), रविवार पेठ, लक्ष्मण महाराज नगर, पुणे नाकार, अक्कलकोट रोड (इस्कॉन टेम्पल), स्टरलिंग मोटार (शिवाजीनगर), एमआयडीसी नगर (आशानगर), जिल्हा क्रिडा संकूल, बाळे, मोदी, जिल्ह्यातील गुळवंची, नान्नज, मंगळवेढा, होटगी आदी परिसरात लावलेली झाडांचे छान संगोपन झाल्याचे सिद्धेश्वर टेंगळे यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमासाठी अमित बनसोडे, सिद्धेश्वर टेंगळे, द्वारकेश सावंत, सागर चिंचोळकर, संतोष वायदंडे, अर्जुन बनसोडे, रोहन खंदारे, दीपक गायधनकर, अजय आलुरे, रोहित कसबे, प्रशांत गाजूल, नरेश गाजूल, योगेश लोखंडे, सागर संभारम, तानाजी गोरड, तानाजी यादव ही मंडळी कार्यरत आहेत.
वृक्षारोपणासाठी वापरलेली झाडे- वूक्षारोपणासाठी प्रामुख्याने देशी पर्यावरणपूरक, आॅक्सिजन देणाºया वृक्षांचे रोपण करण्यावर या फाऊंडेशनने भर दिला आहे. यामध्ये पिंपळ, कडुलिंब, आवळा, कांचन, चिंच, कवट, बेंडा, वड, गुगळ, रानभेंडी, जांभळ, उंबर, आबा अशा झाडांचा समावेश आहे. सोलापूरचे वाढते तापमान रोखावे, हरित सोलापूर होण्याच्या दृष्टीने चालवलेल्या या प्रयत्नासाठी सक्रीय सहभाग नोंदवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
एक व्यक्ती एक झाड उपक्रम- उन्हाळ्यातील तापमानाची वाढती तीव्रता आणि कमी होणारे पर्जन्यमान ही सुध्दा सोलापूरची एक ओळखच बनली आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. पुढच्या उन्हाळ्यातील तापमानाची तीव्रता कमी करायची असेल तर आत्तापासूनच प्रयत्न करावे लागतील. म्हणूनच हरित वसुंधरा फाउंडेशनने 'एक व्यक्ती एक झाड' या उपक्रमाचे आयोजन केले आहे. एक रोप देऊन सर्वजण या उपक्रमात आपण सहभागी होऊ शकता. फाऊंडेशनच्या वतीने ही रोपं सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात लावली जातील. आपल्या घराच्या परिसरात, रस्त्याच्या दुतर्फा, शाळांमध्ये, महाविद्यालयात, धार्मिकस्थळ आणि कार्यालयाच्या परिसरात मोफत वृक्षारोपणासाठी आपण फाउंडेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.