शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

आॅनलाइन खंडणीचा भारताला मोठा धोका

By admin | Published: June 06, 2016 1:54 AM

अपहरणकर्त्यांनी घरातील एखाद्या सदस्याचे अपहरण करून अमुक इतक्या मोठ्या रकमेची मागणी केली. पैसे मिळाले नाही तर अपह्रत व्यक्तीला ठार मारण्याची धमकी मिळाली.

अनिल भापकर,  औरंगाबादअपहरणकर्त्यांनी घरातील एखाद्या सदस्याचे अपहरण करून अमुक इतक्या मोठ्या रकमेची मागणी केली. पैसे मिळाले नाही तर अपह्रत व्यक्तीला ठार मारण्याची धमकी मिळाली. शिवाय पोलीसांना कळविल्यास अपह्रत व्यक्तीला ठार मारण्याची धमकी अशा तऱ्हेच्या बातम्या वर्तमानपत्रात पूर्वीपासून सर्रास वाचायला मिळतात.आता या टेक्नो काळात गुन्हा करण्याची पद्धत आणि गुन्हेगार दोन्ही बदलले आहेत.एखाद्या दिवशी तुम्ही तुमचा संगणक किंवा लॅपटॉप चालू करायला जाता आणि त्यावर एक मेसेज तुम्हाला दिसतो कि तुमचा संगणक किंवा लॅपटॉप आम्ही हॅक केलेले असून तुमचा संपूर्ण डेटा तुम्हाला हवा असल्यास स्क्रिनवर दिसत असलेल्या पेमेंट आॅप्शनला क्लिक करून अमुक इतकी रक्कम या बँक खात्यात पुढील अमुक इतक्या तासात जर जमा झाली नाही तर तुमचा सर्व डेटा डिलिट होईल. तुमच्या स्क्रीनवर एका बाजूला तुम्हाला दिलेल्या वेळेचे काउंट डाऊन सुद्धा चालू झालेले दिसेल. अर्थात तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा संपूर्ण ताबा या हॅकर्स ने घेतलेला असतो. या मेसेजच्या पुढे तुमचा संगणक किंवा लॅपटॉप जातच नाही . या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला रॅन्समवेअर असे म्हणतात. यामध्ये कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणी तुम्हाला खंडणीची मागणी करतो. असे प्रकार जगात अनेक ठिकाणी उघडकीस आलेले आहेत . विशेष म्हणजे असे गुन्हे उघडकीस आलेल्या देशांच्या यादीत भारताचा पाचवा क्रमांक लागतो. म्हणजेच रॅन्समवेअर या सायबर गुन्हेगारीचा भारताला फार मोठा धोका आहे.काय काळजी घ्यावी ?१सगळ्यात आधी तर तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपमध्ये चांगला अँटीव्हायरस असणे, तसेच अँटीव्हायरस नियमित अपडेट असणे आवश्यक आहे. २इंटरनेट वापरताना नेहमी सुरक्षित वेबसाइटलाच भेट द्या. कुठल्याही मोफत भूलथापांना बळी पडून चुकीच्या वेबसाइटला भेट देऊ नका.३संगणक किंवा लॅपटॉपची आॅपरेटिंग सीस्टमही नेहमी अपडेट असावी. कारण अपडेटमध्ये बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम्सवर सोल्युशन उपलब्ध असते.४तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा डेटा नियमित कॉपी करून दुसऱ्या हार्ड डिस्कवर ठेवावा. म्हणजे तुमचा संगणक हॅक झाला आणि तुमच्या डेटाच्या बदल्यात हॅकरने तुमच्याकडे पैसे मागितले, तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.‘स्मार्टफोन’ला ही धोका संगणकांप्रमाणे स्मार्टफोनलाही हॅकिंगचा धोका वाढला आहे. काही जाहिराती दाखवल्या जातात. त्यातील काही जाहिराती हॅकरने तुम्हाला भुलवण्यासाठी सुद्धा टाकल्या असू शकतात. त्यामुळे अशा जाहिरातीला क्लिक करू नये. एखादे अ‍ॅप तुमच्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करण्यापूर्वी ते सुरक्षित आहे की नाही हे पाहून घ्या. शक्यतो गुगल प्ले वरून अ‍ॅप इन्स्टॉल करा. कुठलीही ए पी के फाइल घेऊन अ‍ॅप तुमच्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करू नका .