पुणे : मानवविरहित विमानाच्या माध्यमाने शत्रूच्या भूमीत जाऊन हवाई हल्ले करण्याची क्षमता आता भारतीय लष्कराकडेही येऊ घातली आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) ‘रुस्तम २’ नावाने देशी बनावटीचे ड्रोन विमान विकसित केले आहे. खासगी कंपन्यांच्या सहभागाने या विमानाची निर्मिती लवकरच सुरू होणार आहे.दहशतवाद्यांशी लढण्यासाठी अमेरिकन ड्रोन विमाने प्रभावी ठरत असताना आता भारताकडेही अशी ताकद विकसित करण्यासाठी डीआरडीओने खासगी कंपन्यांच्या सहभागाने पुढाकार घेतला आहे. यापूर्वी भारताकडे ‘रुस्तम १’ हे मानवविरहीत विमान कार्यरत आहे. हे विमान शत्रूच्या भागांमध्ये जाऊन तेथील तपासणी करून येऊ शकते. मात्र यात स्फोटके नेण्याची आणि स्फोट घडवून आणण्याची क्षमता नाही. ती ‘रुस्तम २’मध्ये असेल.सशस्त्र सैन्यदलातील लष्कर, हवाईदल व नौदलासाठीही या ड्रोनची निर्मिती केली जात आहे. भविष्यात सौरऊर्जेवर उडण्याची क्षमता असलेल्या आणि कमी वजनाच्या देशी बनावटीच्या ड्रोनच्या निर्मितीचाही शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे.
शत्रूच्या प्रदेशात झेपावणार भारताचा ‘रुस्तम’
By admin | Published: January 05, 2015 4:32 AM