शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

घोसाळकरांवर कारवाईचे सेनेचे संकेत

By admin | Published: January 25, 2017 3:56 AM

ऐन निवडणुकीच्या तोंडावर दहिसर विभागातील अंतर्गत वाद उफाळून आल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत. येथील पक्षांतर्गत

मुंबई : ऐन निवडणुकीच्या तोंडावर दहिसर विभागातील अंतर्गत वाद उफाळून आल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत. येथील पक्षांतर्गत वाद शमविण्यासाठी पक्षाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी आपल्याच पक्षाचे नगरसेवक शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांच्याविरोधातील तक्रार मागे घ्यावी अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पक्षाने दिला आहे. दहिसर येथील एका उद्यानाचे उद्घाटन आणि एका कार्यक्रमामुळे आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार घोसाळकर यांनी आयोगाकडे केली होती. यामुळे शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव या तीनही उमेदवारांची उमेदवारी धोक्यात आली आहे. पक्षांतर्गत गटबाजीने फटका बसू नये यासाठी सेना नेतृत्वाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. दहिसर येथील उद्यानाचे १० जानेवारी रोजी उद्यानाचे उद्घाटन झाले. मात्र १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून झालेल्या स्नेहसंमेलनाला शुभा राऊळ यांच्याबरोबर नगरसेविका शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव हे आमंत्रित होते. मात्र या कार्यक्रमावर अभिषेक घोसाळकर यांनी आक्षेप घेतला. दरम्यान, अधिकार नसताना महापालिकेच्या सहायक आयुक्तांनी गुन्हे दाखल केल्याची लेखी तक्रार शुभा राऊळ यांनी आयुक्तांकडे केली आहे. (प्रतिनिधी)