शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
2
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
3
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
4
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
5
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
6
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
7
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
8
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
9
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
10
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
11
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
12
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
13
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
14
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
15
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
16
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
17
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
18
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
19
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
20
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  

युती कायम राहण्याचे संकेत

By admin | Published: February 27, 2017 1:49 AM

शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष कल्याण-डोंबिवली पालिकेत पुन्हा एकत्र येत आहेत.

मुरलीधर भवार, प्रशांत माने,कल्याण- आधी भांडून, वेगळे लढून नंतर एकत्र सत्तेसाठी एकत्र आलेले शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष कल्याण-डोंबिवली पालिकेत पुन्हा एकत्र येत आहेत. त्याबाबतचे स्पष्ट संकेत मंगळवारी दुपारी मिळतील. मुंबईच्या सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार की नाही; यावर कल्याण-डोंबिवलीची गणिते ठरतील, असे गृहीत धरून मध्यंतरी पुढे ढकललेल्या परिवहन समिती आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत हे ऐक्य पुन्हा जुळून येण्याचे स्पष्ट संकेत वरिष्ठ नेत्यांनी दिले. मुंबई, ठाणे, उल्हासनगर पालिकेच्या प्रचारात शिवसेना-भाजपा परस्परांवर टीका करत असताना जर कल्याण-डोंबिवलीतील या समित्यांच्या निवडणुका युती करत लढवल्या असत्या, तर दोन्ही पक्षांना त्याचे समर्थन करणे कठीण गेले असते म्हणून या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यातही शिवसेनेच्या नेत्यांनी आधी भाजपाला शह देण्यासाठी मनसेला सोबत घेत असल्याची तयारी दाखवली. पण स्वत:हून संपत चाललेल्या या पक्षाला पुन्हा धुगधुगी देण्याची गरज नाही, हा सुप्त संदेश वेळेत पोचल्याने त्या पक्षाला वेळीच दूर करण्यात आले. ते लक्षात आल्यावर मनसेच्या नेत्यांनी शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येणार असल्याचा बोभाटा केला. आताचा मनसेची दारूण अवस्था पाहता त्या पक्षाला मदत करून मोठे न करण्याबाबत शिवसेना-भाजपात एकमत आहे. ही गणिते लक्षात घेता शिवसेना-भाजपा आधीच्या तहानुसार परस्परांना मदत करतील आणि युती कायम ठेवतील, असे संकेत आहेत. त्याबाबतचा योग्य संदेश मंगळवारी पोचवला जाईल.>परिवहनचे गणित मनसेशिवाय सुटणार?केडीएमसीच्या परिवहन समितीच्या निवडणुकीत कोणत्याच उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. यात शिवसेना आणि भाजपाचे प्रत्येकी तीन, तर मनसेचा एक सदस्य आहे. संख्याबळ पाहता भाजपाला तिसरा सदस्य निवडून आणण्यासाठी शिवसेनेच्या मदतीची गरज आहे. मंगळवारी ही निवडणूक होणार आहे. प्रसाद माळी, संजय राणे, कल्पेश जोशी (सर्व भाजपा), संजय पावशे, मधुकर यशवंतराव, मनोज चौधरी (सर्व शिवसेना), संदेश प्रभुदेसाई (मनसे) हे रिंगणात आहेत. एका नगरसेवकाला सहा मते देण्याचा अधिकार आहे. पालिकेतील संख्याबळानुसार शिवसेनेचे तीन सदस्य सहज निवडून जाऊ शकतात. भाजपाचे दोन सदस्य निवडून येऊ शकतात. तिसऱ्या सदस्यासाठी त्यांना अतिरिक्त ७२ मतांची आवश्यकता आहे. शिवसेनेचे आजमितीला ५६ नगरसेवक असल्याने त्यांच्याकडे ३३६ मते आहेत. भाजपाचे ४६ नगरसेवक असल्याने त्यांच्याकडे २७६ मते आहेत. मनसेकडे १० नगरसेवक आहेत. त्यांच्या मतांची संख्या ६० होते. कॉंग्रेसचे ४ नगरसेवक असल्याने त्यांच्याकडे २४, राष्ट्रवादी, एमआयएमचे प्रत्येकी २ सदस्य असल्याने त्यांच्याकडे प्रत्येकी १२ मते आहेत. सेनेच्या मदतीशिवाय मनसेचा सदस्य निवडून जाऊ शकत नाही. तशीच परिस्थिती भाजपाची आहे. याबाबत शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्याप्रमाणे कृती घडेल, असे त्यांनी सांगितले. >नगरसेवकांना लागले वेध शिक्षण समितीचे परिवहनपाठोपाठ आता शिक्षण समिती सदस्य निवड पार पडणार आहे. सध्याच्या समितीची मुदत १८ मार्चला संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक होईल. त्यात सदस्य निवडीचा मुहूर्त निघेल. शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर शिक्षण समिती उदयाला आली. शिक्षण मंडळावर सदस्य नेमताना शिक्षण क्षेत्रातील बाहेरील तज्ज्ञ व्यक्तींना प्राधान्य दिले जायचे. परंतु प्रमाणशीर प्रतिनिधित्वामुळे आता नगरसेवकांचीच या ११ सदस्यांच्या समितीवर वर्णी लावण्यात आली. पूर्वी शिक्षण मंडळाला पाच वर्षांचा कालावधी मिळायचा. आता शिक्षण समितीला वर्षाचा कालावधी मिळतो. पालिकेत सत्ता स्थापन करताना झालेल्या वाटाघाटीत समितीचे पहिले सभापतीपद भाजपाच्या वाट्याला गेले. ही समिती फारशी छाप पाडू शकली नाही. आतापर्यंत त्यांच्या दोनच सभा पार पडल्या.पहिल्या सभेत अपुऱ्या गोषवाऱ्याचा विषय गाजला. नंतर स्थगित विषयांवर दुसरी सभा झाली. त्यात सहलीसह ई-लर्निंग क्लासेस, संगणक साहित्य खरेदी, मिनी सायन्स सेंटर उभारणे, अबॅक स क्लासेस, क्रीडा साहित्य खरेदीचे प्रस्ताव मान्य मान्य झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांंविना केडीएमसी शिक्षण विभागाच्या कारभाराचा उडालेला बोजवारा, घटत चाललेली विद्यार्थी संख्या, शाळांची दयनीय अवस्था पाहता समितीकडून ठोस निर्णय अपेक्षित होते. परंतु दोनच सभा झाल्याने ही समिती शोभेचे बाहुले ठरल्याची चर्चा आहे. यासंदर्भात सभापती दया गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी व्यस्त असल्याचे सांगत बोलण्यास नकार दिला. >ठाणे, उल्हासनगरमध्येही सत्तेत मिळणार वाटा? युती कायम ठेवण्याचा कल्याण-डोंबिवली पॅटर्न कायम राहिला, तर आपोआपच मुंबई आणि उल्हासनगरबाबतची भूमिकाही स्पष्ट होईल, असे भाजपाच्या गोटात मानले जाते. ठाण्यात शिवसेनेला पूर्ण बहुमत असले, तरी तेथील सत्तेतही भाजपाला वाटा दिला जाऊ शकतो आणि उल्हासनगरमध्ये भाजपा-साई पक्ष एकत्र आले असले, तरी त्या समीकरणांत बदल करून ठाण्याच्या बदल्यात तेथेही शिवसेनेला सोबत घेण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा वरिष्ठ नेत्यांत सुरू आहे. ठाणे आणि उल्हासनरच्या निवडणुकांत कटुता येऊ न देता केलेला प्रचार ही त्याचीच नांदी होती, असे दाखलेही आता दोन्ही पक्षांचे नेते देत आहेत.