डिप्पी वांकाणी, मुंबईशीना बोरा खून प्रकरणातील गेले तीन दिवस बेशुद्ध असलेली मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी रविवारी शुद्धीवर आली. तसेच ती कोठडीत बेशुद्ध होण्यास तणावमुक्तीसाठीच्या औषधांचा ओव्हरडोस कारणीभूत असल्याचे आधीचे आपले ठाम विधान जे.जे. इस्पितळाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी मागे घेतल्याने तुरुंगाधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. जे.जे. इस्पितळाने पाठविलेल्या इंद्राणीच्या तीनपैकी एकाही नमुन्यात लहाने म्हणतात तशा प्रकारच्या कोणत्याही औषधाचा लवलेशही आढळला नसल्याचा स्पष्ट अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेने (एफएसएल) शनिवारी दिल्याने इंद्राणीच्या बेशुद्धीचे गूढ वाढले होते. मात्र आता जे. जे. इस्पितळाने भूमिका बदलल्याने इंद्राणी शुक्रवारी सकाळी ६ वाजता बेशुद्ध होऊन कोठडीत कोसळ््यावरही तुरुंगातील डॉक्टरांनी तिला सकाळी ११ पर्यंत जे. जे. इस्पितळात का दाखल केले नाही, ही आमच्या चौकशीची मुख्य दिशा असेल असे तुरुंग प्रशसनातील सूत्रांनी सांगितले.शुक्रवारी इंद्राणी पहाटे ५ वाजता उठली व ती गीता वाचू लागली. त्यावेळी तिने भोवळ येत असल्याची तक्रार केली होती. त्यावेळी तुरुंगात असलेले निवासी डॉक्टर्स केळणीकर आणि खान यांनी तिला तपासले. तिची प्रकृती खूपच बिघडल्यानंतर मानद डॉक्टर वकार शेख यांना बोलावण्यात आले. भायखळा तुरुंगात इंद्राणीला ठेवल्यानंतर लगेचच तिने निद्रानाश व भोवळ येत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर जे. जे. हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागाच्या व्हिजिटिंग डॉक्टर सारिका दक्षीकर यांनी तिच्यावर झोपेच्या आणि अँटी डिप्रेशनच्या गोळ््यांचा उपचार केला होता.बी. के. सिंह म्हणाले की, इंद्राणी आमच्या ताब्यात असल्याने ती पुन्हा बरी व्हावी, हाच आमचा उद्देश आहे.
इंद्राणी शुद्धीवर, तरी बेशुद्धीचे गूढ कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2015 3:46 AM