शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

इंदू मिलमध्ये स्मारकासाठी अवघी २.८१ हेक्टर जमीन!

By admin | Published: April 14, 2017 2:09 AM

इंदू मिलची जमीन १२ एकर असली तरी सीआरझेडमुळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अवघ्या २.८१ हेक्टर जमीनीवरच उभे राहू शकेल. इंदू मिलमधील २.३ हेक्टर

मुंबई: इंदू मिलची जमीन १२ एकर असली तरी सीआरझेडमुळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अवघ्या २.८१ हेक्टर जमीनीवरच उभे राहू शकेल. इंदू मिलमधील २.३ हेक्टर जमिनीवर सीआरझेडचे आरक्षण असल्याने तेथे बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे भविष्यात हे आरक्षण उठवले तरी बाबासाहेबांच्या स्मारकाव्यतिरिक्त तेथे अन्य काहीही उभे करण्यास आमचा विरोध राहील, अशी भूमिका या प्रश्नी सतत पाठपुरावा करणारे चंद्रकांत भंडारे यांनी जाहीर केली आहे. केंद्र सरकारने मात्र ही जमीन हस्तांतरण करताना सीआरझेडचे आरक्षण न बदलता १२ एकर जमीनी राज्य सरकारकडे हस्तांतरीत केली आहे. राज्य सरकारनेही जमीन स्वीकारली आहे. तथापि, भविष्यात सीआरझेडचे आरक्षण उठवून अन्य कोणतेही बांधकाम करण्याचा प्रयत्न झाल्यास तो प्रयत्न हाणून पाडण्याचा इशाराही चंद्रकांत भंडारे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे शैलेंद्र कांबळे यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला. मागच्या सरकारने आंबेडकरांच्या स्मारकाचे बिल सभागृहात न मांडल्याने त्याचे कायद्यात रुपांतर झाले नाही. तथापि, जुलै २०१६मधील एका पत्राची दखल घेत नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलच्या ४ हजार ८४१४.८३ चौरस मीटर एवढी संपूर्ण जमीन राखीव ठेवण्याचा निर्णय अटर्नी जनरल यांचा सल्ला घेऊन घेतला. या संदर्भातील वस्तुस्थितीकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचा आरोप भंडारे, कांबळे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)जनतेची फसवणूक इंदू मिल जमिनीचे हस्तांतरण / अधिग्रहण व्यवहार पूर्ण न करता ११ आॅक्टोबर २०१५ रोजी आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपुजन झाले. त्यानंतर जमीन अधिग्रहण करण्यात यावे, यासाठी पाठपुरावा करण्यात आला. संपूर्ण इंदू मिलच्या जमिनीवर स्मारकाचे भूमिपुजन करुन नंतर जागा आरक्षित असल्याचे सांगून सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप भंडारे, कांबळे यांनी केला.