नागपूर : विदर्भ व मराठवाड्यातील उद्योगांना वीज दरात सवलत मिळण्याची आशा बळावली आहे. वीज दर निश्चितीबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीने दोन्ही विभागांना स्वस्त दरात वीज देण्याची शिफारस केली आहे.अहवालातील तरतुदीप्रमाणे विजेचा जेवढा वापर केला जाईल, तेवढीच सवलत मिळेल. त्यामुळे त्याचा उद्योगांना चांगला फायदा मिळेल. संबंधित अहवाल मंत्रिमंडळाच्या विचाराधीन असून त्यावर लवकरच अंतिम निर्णय होईल. राज्य सरकारने विदर्भ- मराठवाड्याला स्वस्त वीज देण्यासाठी औरंगाबाद, अमरावती व नागपूरच्या विभागीय आयुक्तांसह महावितरणच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे. समितीने शेजारच्या राज्यांचा दौरा करून सरकारला अहवाल सादर केला. मंत्रिमंडळाला मंगळवारी अहवालावर निर्णय घ्यायचा होता. संबंधित अहवाल ५० पानांचा असल्याने त्यावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. (प्रतिनिधी)
उद्योगांना स्वस्त विजेची शिफारस
By admin | Published: December 23, 2015 1:59 AM