मुंबई : मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी राज्यातील उद्योगांनी आपले प्रस्ताव संबंधित जिल्ह्यांचे अधीक्षक अथवा कृषी अधिकारी यांच्याकडे पाठवावे, असे आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे.
फुंडकर म्हणाले की, कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी 'मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना 2017' ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. राज्याचे अन्न प्रक्रिया धोरणही 4 नोव्हेंबर 2017 रोजी जाहीर करण्यात आले आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी उद्योजकांनी आपले प्रस्ताव जिल्हा कृषी अधिकारी किंवा अधीक्षक यांच्याकडे सादर करावेत.
टोमॅटो, मनुका, काजू, हळद, मिरची, मिनी डाळमिल, मिनी तांदूळ मिल इत्त्यादी व्यवसायमध्ये प्रक्रिया करण्यासाठी उद्योगांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करावे,असे आवाहनही कृषीमंत्र्यांनी केले आहे.