ठाणे : मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिम याला अनेक आजारांनी ग्रासले असून, त्याला मरण्यासाठीच भारतात यायचे आहे, हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे विधान खोडून काढणारी माहिती खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या इक्बाल कासकरकडून पोलिसांना मिळाली आहे. पाकिस्तानमध्ये असलेल्या दाऊदची प्रकृती ठणठणीत असून त्याचा मधुमेह आता नियंत्रणात आहे. त्याची पत्नी मेहजबीन खान गेल्या वर्षी मुंबईत येऊन गेल्याचा दावाही इक्बालने केला.दाऊदला अनेक गंभीर आजार जडले असून मरण्यासाठीच त्याला भारतात यायचे असले तरी, मोदी सरकार त्याला पकडण्याचे श्रेय घेण्याच्या बेतात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. ठाण्यात अटकेत असलेला दाऊदचा भाऊ इक्बालने मात्र नेमकी उलट माहिती पोलिसांना दिली आहे. दाऊदला मधुमेहाचा त्रास होता; मात्र आता त्याचा मधुमेह नियंत्रणात आहे. त्याला कोणताही दुर्धर आजार नसून तो ठणठणीत असल्याचा दावा इक्बालने केला आहे.इक्बालचे तीन मोबाइल फोन पोलिसांनी जप्त केले. त्यापैकी एकाही मोबाइलवरून त्याने पाकिस्तानला कॉल केल्याचे आढळलेले नाही. दुबईला त्याची पत्नी आणि दोन मुले राहतात. इक्बालने भारताव्यतिरिक्त केवळ दुबईला कॉल केल्याचे स्पष्ट झाले आहे. एका नातेवाइकाचे निधन झाल्याने गेल्या वर्षी दाऊदची पत्नी मेहजबीन खान मुंबईत आली होती. पाकिस्तानी पासपोर्टवर भारतात आल्यानंतर ती काही दिवस वर्सोवा येथे वास्तव्यास होती. त्या वेळी माझी तिच्याशी भेट झाली होती. फोन टॅप होण्याच्या भीतीने दाऊद गेल्या तीन वर्षांपासून नातेवाइकांच्या संपर्कात नाही. मात्र मी अनिस अहमदच्या संपर्कात असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. इक्बालची घरच्या जेवणाची मागणी फेटाळत त्याची औषधांची मागणी ठाणे पोलिसांनी मान्य केली आहे.>एक नगरसेवक मेजवानीलाखंडणी प्रकरणात ठाण्यातील नगरसेवकांच्या सहभागाची माहितीही पोलिसांनी इक्बालकडून काढण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील दोन नगरसेवक संपर्कात असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.एक नगरसेवक मेजवानीसाठी नागपाड्यातील घरी येऊन गेल्याचेही त्याने सांगितले आहे. मात्र तो नेमका कधी आला होता, हे आठवत नसल्याचे तो म्हणाला.>ठाणे पोलिसांचे पथक बिहारलाठाण्यातील एका बिल्डरकडून खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली इक्बाल कासकरसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी एक आरोपी मुमताज इजाज शेख हा पाटणा येथील आहे. त्याच्या ओळखीने बिहारमधील काही गुंडांची मदत खंडणीसाठी इक्बाल घेत होता. अशा काही गुंडांची माहिती मिळाल्याने त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक दोन दिवसांपासून बिहारमध्ये आहे.>माझी पत्नी व दोन मुले दुबईत राहतात. त्यांना भेटायला दाऊदची पत्नी मेहजबीन खान दुबईला गेली होती. त्या वेळी ती माझ्याशी फोनवर बोलली होती, अशी माहिती इक्बालने पोलिसांना दिली.
कुख्यात दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये ठणठणीत, गेल्या वर्षी दाऊदच्या पत्नीची मुंबई वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 6:14 AM