शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
3
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
4
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
8
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
9
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
10
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
11
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
12
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
13
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
14
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
15
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
16
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
17
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
18
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
19
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
20
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान

स्तनदा मातांसाठी ‘शिशुपोषण’ अ‍ॅप

By admin | Published: May 18, 2016 2:30 AM

आई होण्याच्या आनंदाबरोबरच नवजात शिशूचे पालन-पोषण, त्याचे आरोग्य सुदृढ व्हावे म्हणून कोणती काळजी घ्यावी

मुंबई : आई होण्याच्या आनंदाबरोबरच नवजात शिशूचे पालन-पोषण, त्याचे आरोग्य सुदृढ व्हावे म्हणून कोणती काळजी घ्यावी, अशा अनेक समस्या मातांना भेडसावत असतात. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे अनेक मातांना बाळाची काळजी कशी घ्यावी, याविषयी सांगायला घरी कोणी नसते. त्यामुळे पहिल्या सहा महिन्यांत बाळासाठी स्तनपान किती महत्त्वाचे आहे, याची माहिती देणारे ‘शिशुपोषण’ अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. या अ‍ॅपद्वारे स्तनपानाविषयीची माहिती मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत मिळणार आहे. मुंबई ब्रेस्टफिडिंग नेटवर्क संस्थेने मातांना स्तनपानाविषयी माहिती देण्यासाठी सविस्तर माहिती एकत्र केली. स्तनपान कसे करावे, कोणती काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, स्तनपानाने मुलांच्या आरोग्याला कोणता उपयोग होतो अशी सर्व माहिती या अ‍ॅपवर मातांना उपलब्ध होणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. कामाक्षी भाटे यांनी दिली. ‘टीसीएस’ने ही माहिती घेऊन ‘शिशुपोषण’ हे अ‍ॅप विकसित केले आहे. अ‍ॅण्ड्रॉईड फोनमध्ये हे अ‍ॅप सहज उपलब्ध होणार आहे. आजकाल प्रत्येक महिलेकडे स्मार्टफोन असतो. इंटरनेटच्या माध्यमातून त्यांना अनेक प्रकारची माहिती मिळत असते. पण, ही माहिती शास्त्रशुद्ध असतेच असे नाही. त्यामुळे मातांना चुकीची माहिती मिळाल्यास नुकसान होऊ शकते. अनेक महिला विभक्त कुटुंबात राहत असल्यामुळे त्यांना नीट माहिती नसते. अशा महिलांना शास्त्रशुद्ध माहिती मिळावी यासाठीच हे अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. यामध्ये स्तनपानाविषयी शास्त्रशुद्ध माहिती देण्यात आली असल्याचे डॉ. भाटे यांनी स्पष्ट केले. स्तनपान योग्य पद्धतीने दिले तर बालमृत्यूचे प्रमाण १४ टक्केपर्यंत कमी होऊ शकते. मूल अधिक निरोगी आणि हुशार होते. (प्रतिनिधी)