नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक घडली आहे. यामुळे ऐन थंडीमध्ये बाजारभाव वाढू लागले आहेत. होलसेल मार्केटमध्ये आठ दिवसांमध्ये फ्लॉवरचे दर दुप्पट वाढले असून शेवगा, शेंग, हिरवी मिरचीचे दरही कडाडले आहेत. बाजार समितीमध्ये हिवाळा सुरू झाल्यापासून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत होती. रोज ३ हजार टनपेक्षा जास्त आवक होत असल्यामुळे बाजारभाव वाढू लागले होते. परंतु सोमवारी ५६९ वाहनांमधून २९०३ टन भाजीपाला विक्रीला आला आहे. यामध्ये ५ लाख ३५ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. राज्याच्या विविध भागातून भाजीपाला विक्रीला येत आहे. वाटाणा मध्य प्रदेशमधून तर इतर काही वस्तूंची गुजरातमधून आवक होत आहे.
आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. एक आठवड्यापूर्वी फ्लॉवर ६ ते ८ रुपये किलो दराने विकला जात होता. आता हेच दर १४ ते २० रुपयांवर गेले आहेत. शेवग्याची शेंग ६० ते ८० वरून ७० ते १२० रुपयांवर गेले आहेत. हिरव्या मिरचीचा ठसकाही वाढू लागला आहे. गेल्या सोमवारी २० ते २८ रुपये किलो दराने विकली जाणारी ज्वाला मिरचीचे दर ४० ते ५० रुपायांवर पोहचले आहेत. टोमॅटो, वाटाणा, घेवडा, काकडी व इतर भाजीपाल्यांचे दरही वाढले आहेत. आवक कमी झाली असून मागणी वाढल्यामुळे दरामध्ये फरक पडला असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
हिरव्या मिरचीचा ठसकाही वाढलाहिरव्या मिरचीचा ठसकाही वाढू लागला आहे. गेल्या सोमवारी २० ते २८ रुपये किलो दराने विकली जाणारी ज्वाला मिरचीचे दर ४० ते ५० रुपायांवर पोहचले आहेत.
एपीएमसीमधील प्रतिकिलो दर भाजी ९ जानेवारी १६ जानेवारी फरसबी १५ ते २५ २५ ते ४५फ्लॉवर ६ ते ८ १४ ते २० घेवडा ३० ते ३६ ४० ते ६०काकडी १५ ते २२ १६ ते २४ढोबळी मिरची २० ते २८ २० ते ४०शेवगा शेंग ६० ते ८० ७० ते १२०टोमॅटो ७ ते १० १० ते १८वाटाणा १८ ते २६ २६ ते ३०वांगी १८ ते २४ २० ते ४०भेंडी २५ ते ५० ३० ते ५२