अहमदनगर : कडाक्याचे ऊन, पावसाची रिमझिम, ढगाळ हवामान, कधी थंडी अशा विचित्र वातावरणामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांची लागण झाली आहे. महिनाभरात एकट्या कोपरगाव तालुक्यात पाच तर शिर्डीत एकाचा बळी गेला.सर्दी, डोकेदुखी, गोचीड ताप, टायफॉईड, कावीळ, खोकला आदींमुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ जिल्ह्यातील बहुसंख्य शासकीय व खासगी रुग्णालये रुग्णांनी भरली आहेत. जिल्ह्यातील पालिका प्रशासनाकडे धूर फवारणीची मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)खासगी रुग्णालयांत नेहमीपेक्षा चार पटीने रुग्णांची संख्या वाढली आहे़ रुग्णालयांत रक्त, लघवी आदी तपासण्यांसाठी रांगा पहायला मिळत आहेत. त्यात डेंग्यूने डोके वर काढल्याने विविध तपासण्या करण्याकडे रुग्णांचा कल आहे. गोचीड तापाची लागण झाल्याने आजारपण आठवडाभर राहत असल्याने लोक घाबरले आहेत. थोडी शंका आली तरी, लोक डॉक्टरांकडे जात आहेत. साथीचे आजार नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत़ डेंग्यू किंवा मलेरिया पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत़ - डॉ़ पी़ डी़ गांडाळ,जिल्हा आरोग्य अधिकारीविविध रुग्णालयांच्या अहवालानुसार प्रतिदिन पाच ते सहा डेंग्यू सदृश्य आजाराचे संशयित रुग्ण आढळून येत आहेत़ मात्र, गेल्या काही दिवसांत हे प्रमाण कमी झाले आहे़ - डॉ़ अनिल बोरगे,आरोग्य अधिकारी, महापालिका
नगरमध्ये साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव
By admin | Published: August 30, 2016 6:10 AM