शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील शाळांची माहिती लवकरच होणार ऑनलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 04:58 IST

यु-डायस प्लस; १५ मेपर्यंत डाटा अपटेड करण्याचे आदेश

- अविनाश साबापुरे यवतमाळ : देशभरातील १५ लाख शाळांची इत्यंभूत माहिती लवकरच एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्या दृष्टीने प्रत्येक शाळेची माहिती यु-डायस प्लस या पोर्टलवर संगणकीकृत करण्याचे आदेश मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिले आहे.पहिली ते बारावीपर्यंतच्या प्रत्येक शाळा या पोर्टलवर नोंदविणे बंधनकारक आहे. एखाद्या शाळेला शासनाची मान्यता नसेल तरीही त्या शाळेची माहिती पोर्टलवर भरावी लागणार आहे. शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी आजपर्यंत यु-डायसवरील आकडेवारी विचारात घेतली जात होती. मात्र आता मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत काम करणाºया दिल्ली येथील नॅशनल इन्फरमेटिक सेंटरने यु-डायस प्लस हे पोर्टल विकसित केले आहे. त्यावर सर्व शाळांची माहिती अपडेट करण्याची जबाबदारी शाळा पातळीवरील कर्मचाऱ्यांना सोपविण्यात आली आहे.पुढील महिन्यात २०१९-२० या सत्रातील योजनांचे समग्र शिक्षा अभियानाचे अंदाजपत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या अंदाजपत्रकासाठी २०१८-१९ या सत्रातील पटसंख्या व अन्य आकडेवारी गृहित धरली जाणार आहे. मात्र ही आकडेवारी यु-डायस प्लस पोर्टलवरुन घेतली जाणार आहे. त्यामुळे पोर्टलवर १५ मेपर्यंत माहिती भरण्याचे आदेश देण्यात आले आहे.महाराष्टÑात पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग असलेल्या जवळपास एक लाख नऊ हजार शाळा आहेत. त्या प्रत्येक शाळेची भौतिक सोई-सुविधांसह, कर्मचारी वर्ग व पटसंख्या अशी इत्यंभूत माहिती भरली जाणार आहे. त्यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे.यु-डायस प्लस पोर्टलवर माहिती भरण्यासाठी जिल्हास्तरावर कार्यशाळा घेण्यात आली आहे. तसेच तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगिनही करून दिले आहे. केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी अशा विविध पातळ्यांवर माहिती तपासूनच अंतिम केली जाणार आहे. विविध शिष्यवृत्त्या, मध्यान्ह भोजन योजना व इतर योजनांसाठी ही माहिती वापरली जाणार आहे.- डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी, यवतमाळ.

टॅग्स :Schoolशाळाonlineऑनलाइन