ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 16- भारतातील एक आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसमधील एका कर्मचा-यानं आत्महत्या केली आहे. इन्फोसिस या कंपनीत काम करणाऱ्या एका 24 वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रहाटणी येथे आज दुपारच्या सुमारास घराच्या आठव्या मजल्यावरून या तरुणानं उडी मारून स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. निनाद देशभूषण पाटील या तरुणानं आत्महत्या केली असून, इम्फोसिस कंपनीत तो आयटी विभागात कामाला होता. निनादने आठव्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर त्याला तात्काळ पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. निनादने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, मी स्वःइच्छेने आत्महत्या करीत असून, यामध्ये माझ्या आई-वडिलांना दोषी धरण्यात येऊ नये. मात्र निनादनं आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. निनादनं नैराश्येतून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.(इन्फोसिस करणार 10 हजार अमेरिकी कर्मचाऱ्यांची भरती)तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-1 बी व्हिसाचे नियम कडक करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याचे परिणाम आता दिसू लागले होते. भारतातील एक आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिस अमेरिकेत उभारणार असलेल्या चार ‘टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन हब’साठी तब्बल 10 हजार अमेरिकी कामगारांची भरती करणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, यांत्रिक शिकवणी, वापर अनुभव आणि क्लाऊड व बीग डाटा यासारख्या नव्या तंत्रज्ञान क्षेत्रावर इन्फोसिस लक्ष केंद्रित करणार आहे, अशी माहिती कंपनीचे सीईओ विशाल सिक्का यांनी दिली.