- सोपान पांढरीपांडेनागपूर - बँकांचे अवाढव्य कर्ज थकवून विदेशात पळून जाण्याचे प्रकार उद्योगपतींनी केल्याचे यापूर्वी उघडकीस आले आहे. यात विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहूल चोकसी, ललित मोदी, कैलास अग्रवाल, नीलेश पारेख, किरण मेहता, बलराम गर्ग आणि इतरांचा समावेश आहे. त्यामुळे सध्या ज्या उद्योगपतींनी बँकांचे कर्ज थकविले आहे त्यांची चौकशी करून त्यांना विदेशात पळून जाण्यापासून परावृत्त करावे, अशी मागणी राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी सीबीआयकडे केली आहे.खा. संजय सिंह हे संसदीय समिती (कोळसा व पोलाद) व कृषी मंत्रालयाच्या कृषी व कृषक कल्याण या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. सीबीआयला पाठविलेल्या पत्रात खा. सिंह यांनी देशातील १८ उद्योगपती व त्यांच्या उद्योग समूहांनी बँकांचे किती कर्ज थकविले आहे, त्याची यादीही सादर केली आहे. यामध्ये अनिल अंबानी (१.२५ लाख कोटी), अनिल अग्रवाल (१.०३ लाख कोटी), शशी व रवी रुईया बंधू (१.०१ लाख कोटी), गौतम अदानी (९६,०३१ कोटी), मनोज गौर (७५,१६३ कोटी) यांचा उल्लेख केला आहे. या सर्व थकबाकीदारांबाबत जवळपास सर्व माहिती उघड झाली असून आता त्यांची चौकशी करून त्यांना विदेशात जाण्यापासून परावृत्त करण्याचे काम सीबीआयने करावे, अशी मागणी खा. सिंह यांनी केली आहे.हे आहेत बडे थकबाकीदारक्र. समूह मालक कर्ज (रु.)१. रिलायन्स एडीएजी ग्रुप अनिल अंबानी १.२५ लाख करोड२. वेदांत समूह अनिल अग्रवाल १.०३ लाख करोड३. एस्सार समूह रुईया बंधू १.०१ लाख करोड४. अदानी समूह गौतम अदानी ९६,०३१ करोड५. जेपी समूह मनोज गौर ७५,१६३ करोड६. जेएसडब्ल्यू समूह सज्जन जिंदल ५८,१७१ करोड७. जीएमआर समूह जी.एम. राव ४७,९७६ करोड८. लॅन्को समूह एल. मधुसूदन राव ४७,१०२ करोड९. व्हिडीओकॉन समूह वेणुगोपाल धूत ४५,४०५ करोड१०. भूषण पॉवर अॅन्ड स्टील लि. ब्रिज भूषण सिंगल ३७,२४८ करोड११. जीव्हीके समूह जीव्हीके रेड्डी ३३,९३३ करोड१२. आलोक इंडस्ट्रीज सुरिंदरकुमार भोन २२,०७५ करोड१३. अॅमटेक आॅटो लि. अरविंद धाम १४,०७४ करोड१४. मॉनेज इस्पात अँड एनर्जी लि. संदीप जाजोदिया १२,११५ करोड१५. इलेक्ट्रोस्टील लि. उमंग केजरीवाल १०,२७३ करोड१६. ईरा इन्फा इंजि. लि. एच.एस. भराना १०,०६५ करोड१७. एबीजी शिपयार्ड लि. ऋषी अग्रवाल ६,९५३ करोड१८. ज्योती स्ट्रक्चर्स लि. सदाशिव डी. क्षीरसागर ५,१६५ करोड
बड्या थकबाकीदारांची चौकशी करा, संजय सिंह यांचे सीबीआयला साकडे,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 5:53 AM