सावंतवाडी : सिंधुदुर्गचे तत्कालीन उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या काळात झालेल्या कामाबाबत अनेक तक्रारी असून,त्यांच्या कामाची चौकशी व्हावी यासाठी लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असून, सिंधुदुर्गात वनविभागाच्या अनेक कामात भ्रष्टाचार झाला आहे, असा थेट आरोपही केसरकर यांनी केला आहे. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,सदस्य व्हीक्टर डान्टस, अशोक दळवी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, सावंतवाडीचा विकास करतना कोणताही दुजाभाव मी करणार नाही तसेच काही झाले आणि कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, तरी मी शहराला निधी कमी पडू देणार नाही.मात्र मी नगराध्यक्ष नसलो तरी,येथील जनतेला मी देईन त्या व्यक्तीच्या पाठीशी राहिल यांची मला खात्री असे ही केसरकर यांनी सांगितले तसेच मी प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे,सावंतवाडी पालिकेत चांगले काम केल्यानंतर जिल्ह्यात मी पालकमंत्री म्हणून चांगले काम केले. त्यामुळे मंत्रीपदासाठी मी लाचार होणार नाही,असे सांगत येणारी जबाबदारी प्रत्येक जण आपल्या कामातून पुढे नेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्गात मी पालकमंत्री असतना मोठ्या प्रमाणात निधी आला खरा पण वनविभागाला दिलेला निधी तसेच तत्कालीन उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या काळात झालेली कामे वादग्रस्त ठरली आहेत.त्यामुळे त्यांच्या कार्यकालाची चौकशीची मागणी करणार आहे,अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या असून,असे अधिकारी जिल्हयात पुन्हा येणे चांगले नाही.त्यासाठी या अधिकाºयांची चौकशी व्हावी अशी अपेक्षा ही केसरकर यांनी व्यकत करत लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असून,त्याना सर्व हकीगत सांगणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले