मुंबई : महापालिका निवडणुकीत ११ लाख मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याचे पडसाद आज स्थायी समितीतही उमटले. विशेष म्हणजे या घोळात संशयाच्या सुईचे एक टोक असलेल्या भाजपानेच या वेळेस ओरड सुरू केली. या यादीतून गायब मते आमचीच असल्याने भाजपालाच बहुमत मिळाले असते, असा दावा भाजपाचे दिलीप पटेल यांनी केला. मतदार यादीतील घोळ संशयास्पद असल्याने चौकशीचे आदेश स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान झाले. या वेळी ११ लाख मतदारांची नावे गायब असल्याचे समोर आले. यावर सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गहाळ झालेली ही मते मराठी असल्याचा दावा होत आहे. मात्र भाजपाने यापुढे जात ही मते आपलीच होती, असा दावा केला आहे. भाजपाचे दिलीप पटेल यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे याकडे लक्ष वेधले. (प्रतिनिधी)>आचारसंहितेत पालिका यंत्रणेचा वापर प्रवीण छेडा यांची चौकशीची मागणीमहापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाच भाजपाच्या एका मंत्र्याने महापालिका यंत्रणेचा वापर करून घाटकोपर, गरोडिया नगर या विभागातील खासगी क्षेत्रातील चार रस्त्यांची कामे केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश प्रशासनाला दिले.>ही मते मराठीच११ लाख मतदार गेले कुठे? या यादीतून मराठी नावेच वगळली गेल्याचा आरोप सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केला. तसेच मतदार यादीत घोळ झाला नसता तर बहुमत आमचेच असते, असा दावा भाजपाचे नगरसेवक दिलीप पटेल यांनी या वेळी केला.
मतदार यादीतील घोळाची चौकशी
By admin | Published: March 01, 2017 1:51 AM