औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून न राहता सिडको एन-१ परिसरातील ब्ल्यू बेल सोसायटीने कोरोनाशी दोन हात करण्यासाठी इमारत परिसरातच २० खाटांचे कोविड सेंटर अर्थात विलगीकरण कक्ष तयार केले आहे. सोसायटीतील सदस्य बाधित झाल्यास त्याच्यावर याच सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत. ब्ल्यू बेल सोसायटीने राबविलेला हा उपक्रम इतर सोसायटींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
कोरोना विषाणूने औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या रुग्णांचा ताण मनपाच्या व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सेवेवर पडत आहे. त्यातच सोसायटीतील दोन सदस्य कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यामुळे ब्ल्यू बेल सोसायटीतील सदस्यांनी एकत्र येत नगरसेवक राजू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली २० खाटांचे विलगीकरण कक्ष स्थापन करण्याबाबत हालचाली सुरू केल्या. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळविण्यात आले. सोसायटीत जवळपास २०० कुटुंबे वास्तव्यास आहेत. एकूण सदस्यांचा विचार केला, तर ही संख्या ८०० च्या घरात जाते. यात चार ते पाच डॉक्टर कुटुंबेही राहतात. त्यामुळे त्यांचेही सहकार्य या उपक्रमाला मिळत आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी संकलित केलेल्या निधीतून हा वैद्यकीय उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
जागतिक आरोग्य संघटनेचे निकष पूर्ण करून हे सेंटर उभारले आहे. आगामी दोन महिने कालावधीसाठी २० खाटा भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या आहेत. उर्वरित ३० ते ३५ हजार रुपये खर्चून बेडशीट, पीपीई कीट, वैद्यकीय उपकरणे आदी साहित्य विकत आणण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची काळजी घेणारी राज्यातील ही एकमेव सोसायटी ठरली आहे. इतर सोसायट्यांनी अशा प्रकारचा वैद्यकीय उपक्रम सुरू केला, तर आरोग्य विभागावरील ताणही कमी होणार आहे.
विलगीकरण कक्षात राहणार या सुविधाआॅक्सिजन, पीपीई कीट, सॅनिटाईज्ड बेडस्, मास्क, उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र खोली, बेड व बाथरूमची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याप्रमाणे स्वतंत्र स्वयंपाकघर तयार केले आहे. यामध्ये फ्रीज, मायक्रोओव्हन, सिलिंडर, टीव्ही आदी साहित्य आहे.
घरातील एखादा सदस्य बाधित आढळला, तर महिलांची धावपळ उडते. या विलगीकरण कक्षामुळे महिलांना मानसिक आधार मिळाला आहे. रुग्णाला घरचा डबा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णाची विशेष काळजी घेतली जाणार असल्याने बाधित रुग्णाच्या कुटुंबाला मानसिक बळ मिळणार आहे. -शैलेश कासलीवाल, सदस्य, ब्ल्यू बेल सोसायटी
अन्य महत्वाच्या बातम्या....
दंग्याचा त्रास होत होता; शेजाऱ्याच्या दोन मुलांना चौथ्या मजल्यावरून फेकले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरेंच्या वडिलांचे निधन
जग दुसऱ्या मोठ्या महामारीच्या उंबरठ्यावर; सिंहाच्या हाडांपासून औषध, मद्याची निर्मिती घातक
CoronaVirus जून-जुलै नाही, नोव्हेंबर धोक्याचा! कोरोना उत्पात माजवणार; ICMR चा अंदाज
धक्कादायक! कोरोना पसरण्याच्या भितीने IRS शिवराज सिंहांची आत्महत्या
वाह प्रेमजी! दिलेल्या शब्दाला जागले; आयटी कंपनीला कोरोना हॉस्पिटल बनवले