शहरं
Join us  
Trending Stories
1
“राहुल गांधी संविधान घेऊन सगळीकडे जातात, पण कोर्टाचे आदेश पाळत नाहीत”; कुणी केली टीका?
2
इंडिया आघाडीत मतभेद; अदानी-EVM सारख्या काँग्रेसच्या अजेंड्यावर विरोधकांमध्ये एकमत नाही
3
मनोरुग्ण भावाला शोधता-शोधता 'तोच' वेडापिसा होण्याच्या मार्गावर; महिनाभरापासून जिवाचे रान
4
अरिहंत ऑइल्स कंपनीला घातला सहा काेटींना गंडा; बनावट पावत्यांच्या माध्यमातून फसवणूक, लातुरातील घटना
5
भिवंडीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर 'आयटक'च्या शेकडो कामगारांचे धरणे आंदोलन
6
जळगावमध्ये पारोळानजीक भीषण अपघात; सुरत येथील मध्यमवयीन दाम्पत्य ठार
7
EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार, उद्यापासून स्वाक्षरी मोहीम, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा
8
“गरज सरो, वैद्य मरो हा भाजपाचा धर्म”; बच्चू कडू यांची टीका
9
यूपी गेट, चिल्ला बॉर्डरवर प्रचंड वाहतूक कोंडी… चर्चा निष्फळ झाल्यास शेतकरी दिल्लीकडे कूच करणार! 
10
“उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले”; काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याचा दावा
11
बापरे! लग्नमंडपात शिरला कुत्रा, घातला धुमाकूळ, नवरा-नवरीची पळापळ, अन् मग... (Video)
12
सुखबीर सिंग बादल यांना शिक्षा; सुवर्ण मंदिरातील शौचालय आणि भांडी साफ करण्याचे आदेश
13
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारला केली खास विनंती
14
"तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, शिंदेंना मी आधीच सांगितलं होतं’’, या नेत्यानं केला दावा  
15
स्टीलनंतर आता ईव्ही मार्केटमध्ये JSW Group उतरणार, Tata-Mahindra ला देणार टक्कर!
16
INDU19 vs JPNU19 : भारतीय संघानं २११ धावांनी जिंकला सामना; जाणून घ्या सेमीचं समीकरण
17
जुळून येती रेशीमगाठी! मालिकेच्या सेटवर जमल्या जोड्या, बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते?
18
“निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले
19
"देवीने स्वप्नात येऊन सांगितलं, बळी द्या म्हणजे मुलगा बरा होईल", त्यानंतर घडलं भयानक...  
20
“शेवटी भाजपा सांगेल तेच आता करावे लागणार”; मनसे नेत्याची एकनाथ शिंदेवर टीका

निधीची प्रेरणादायी भरारी

By admin | Published: November 20, 2014 1:07 AM

‘पॅकेज’च्या मागे धावणाऱ्या आजच्या तरुणाईत राजकारण अन् समाजविकासासाठी स्वत:ला वाहून घेणारे चेहरे क्वचितच सापडतात. परंतु त्या केवळ समाजकारणातच उतरल्या नाहीत,

कार्यकर्ता ते मुख्यमंत्र्यांच्या ‘ओएसडी’पर्यंत प्रवासनागपूर : ‘पॅकेज’च्या मागे धावणाऱ्या आजच्या तरुणाईत राजकारण अन् समाजविकासासाठी स्वत:ला वाहून घेणारे चेहरे क्वचितच सापडतात. परंतु त्या केवळ समाजकारणातच उतरल्या नाहीत, तर राजकीय घडामोडींच्या निरनिराळ्या कंगोऱ्यांचा सूक्ष्म अभ्यासदेखील करण्यास सुरुवात केली. विद्यार्थी आंदोलन असो किंवा युवावर्गाशी संबंधित एखादा मुद्दा, सक्रियपणे पुढाकार घेऊन त्यांनी इतरांमध्येदेखील ऊर्जा निर्माण केली. याच गुणांच्या बळावर अवघ्या २७ वर्षांच्या लहान वयातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘ओएसडी’(आॅफिसर आॅन स्पेशल ड्युटी)म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्य ते ‘ओएसडी’पर्यंतच्या प्रवासात क्षणोक्षणी त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतच गेला. विद्यार्थीदशेत असताना हॅण्डबॉलची आघाडीची खेळाडू म्हणून ओळख असणाऱ्या निधी यांनी निरनिराळ्या वक्तृत्व स्पर्धादेखील गाजवल्या. डोळ्यासमोर ध्येय स्पष्ट होते. ‘इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन‘मध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणे हे स्वप्नच नव्हते. उद्योजक विपीन कामदार व तृप्ती कामदार यांची मुलगी असलेली निधी यांनी विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात रस दाखविण्यास सुरुवात केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अन् ‘भाजयुमो’च्या(भारतीय जनता युवा मोर्चा)माध्यमातून राजकारण तसेच समाजकारणाचे संस्कार झाले. देवेंद्र फडणवीस यांना आदर्श मानणाऱ्या निधी यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्याकडेच ‘इंटर्नशिप’देखील केली. २०११ साली ‘भाजयुमो’च्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्य झाल्या. त्यानंतर ‘भाजयुमो’ युवती आघाडी नागपूर शहर अध्यक्ष व ‘भाजयुमो’च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशी मजल त्यांनी मारली. तंत्रज्ञानातील ज्ञान अन् सोशल नेटवर्किंगचा ओढा लक्षात घेता, त्यांना ‘भाजयुमो’च्या ‘सोशल मीडिया सेल’चे राज्य प्रमुखदेखील बनविण्यात आले. (प्रतिनिधी)जबाबदारीने काम करणारनिधीला सुरुवातीपासूनच सक्रिय राजकारणात रस होता. राजकारणाचा जवळून अभ्यास करता यावा याकरिता त्यांनी पुण्यातून ‘मास्टर्स प्रोग्राम इन गव्हर्नमेंटह्ण हा अभ्यासक्रम पूर्ण केला. अशाप्रकारचा हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या त्या नागपुरातील पहिल्या तरुणी होत्या, हे विशेष. या काळात त्यांना निरनिराळ्या देशांना भेटी देऊन तेथील राजकीय प्रणाली जाणून घेण्याचीदेखील संधी मिळाली. सरकारच्या अनेक योजना जनतेपर्यंत पोहोचविणे, निर्णयांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी तंत्रज्ञानाची जास्तीतजास्त मदत कशी होईल हे पाहणे व ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून सरकार घराघरात पोहोचविणे आदी कामे जबाबदारीने करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.विद्यापीठात गाजविले आंदोलननिधी कामदार यांनी ‘भाजयुमो’च्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अडचणींना नेहमीच प्रकाशात आणले. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा फेरमूल्यांकनाच्या मुद्यावर तर त्यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन झाले होते. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची ‘स्पेशल’ परीक्षा घेण्यात यावी, या मागणीवरून या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात केलेले आंदोलन बरेच गाजले होते.