शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
5
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
6
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
7
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
8
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
10
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
11
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
12
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
13
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
14
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
15
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
16
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
17
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
18
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
19
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
20
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका

हुंड्याची मागणी करणा-या नवरदेवाची मंडपाऐवजी पोलिस स्टेशनमध्ये वरात

By admin | Published: January 31, 2016 2:27 AM

वाढीव हुंड्याची मागणी करीत नवरीच्या मामाला मारहाण करणाऱ्या नवरदेवासह त्याचे वडील व तीन नातेवाइकांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ऐरोली येथे

नवी मुंबई : वाढीव हुंड्याची मागणी करीत नवरीच्या मामाला मारहाण करणाऱ्या नवरदेवासह त्याचे वडील व तीन नातेवाइकांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ऐरोली येथे लग्नसमारंभातच हा प्रकार घडला.ऐरोलीतील प्रजापती हॉलमध्ये शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. कळवा येथे राहणाऱ्या मुलीचा त्या ठिकाणी विवाह सोहळा होणार होता. मात्र विधी पूर्ण होण्यापूर्वीच या लग्नसोहळ्याचे रणभूमीत रूपांतर झाले. वडाळा येथे राहणाऱ्या शैलेश गुप्तासोबत या मुलीचे लग्न होणार होते. लग्नासाठी शैलेशच्या कुटुंबीयांनी दोन लाख रुपयांचा हुंडा घेतला होता, असे मुलीच्या घरच्यांचे म्हणणे आहे. शिवाय लग्नाचा संपूर्ण खर्चदेखील मुलीचे आईवडीलच करणार होते. मात्र लग्नात ऐन वेळी नवऱ्याच्या कुटुंबीयांनी अधिक १ लाख रुपयांची मागणी केली. तसेच ही रक्कम मिळेपर्यंत पुढचा विधी करण्यासही त्यांनी नकार दिला. अखेर रक्कम देण्यास मुलीकडच्यांनी असमर्थता दाखवताच नवरदेवाच्या नातेवाइकांनी मुलीच्या मामाला जबर मारहाण केली. या प्रकारात जखमी झालेले मुलीचे मामा कतवारू गुप्ता यांना कळव्याच्या रुग्णालयात दाखल केले आहे.हुंड्याची वाढीव रक्कम न दिल्यास मुलीला मारून टाकू, अशी धमकी नवरदेवाच्या घरच्यांनी लग्नातच मुलीच्या नातेवाइकांना दिली. यामुळे मुलीचे अपंग मामा कतवारू हे सामंजस्याने वाद मिटवण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी नवरदेवाचा भाऊ व त्याच्या मित्रांसोबत त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर काही वेळातच नवरदेवाच्या भावाने व मित्रांनी लग्नसमारंभासाठी आणलेल्या सामानाची तोडफोड करीत नवरीच्या नातेवाइकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी ते सर्व मद्यधुंद अवस्थेत होत, असे मुलीच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. तर त्यांच्याकडून सामानाची आदळाआपट सुरू असताना खुर्ची लागून मुलाचा एक नातेवाईकदेखील जखमी झाला आहे. वेळीच मुलीच्या नातेवाइकांनी १०० नंबरवर पोलिसांशी संपर्क साधल्याने पुढील गंभीर प्रकार टळला. याप्रकरणी मुलाच्या मामाने हुंडा घेतल्याचे मान्य केले. परंतु वाद हा नाचण्यावरून झाल्याचे सांगितले. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात हुंडा मागणे, हत्येचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरदेव शैलेश गुप्ता, वडील दयानंद गुप्ता व तीन नातेवाइकांना अटक करण्यात आली आहे.फरार असलेल्यांचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत काटकर यांनी सांगितले. जखमी झालेले मुलीचे मामा कतवारू गुप्ता यांना कळव्याच्या रुग्णालयात दाखल केले आहे.