शेतकरी वा:यावर, चित्रपट केला करमुक्त : दुपारी 12 च्या सुमारास ‘ओ तुनी माय’ या अहिराणी चित्रपटाचा शुभारंभ
जळगाव : राज्यात एकीकडे दुष्काळी स्थिती असतानाच शुक्रवारी झालेल्या गारपीटीने केळी, कापूस, ज्वारी, डाळींब उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला. गारपीटग्रस्त भागांची पाहणी करून शेतक:यांना दिलासा देण्याऐवजी राज्याचे महसूल, कृषी, मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे जळगावात चित्रपट पाहण्यात रमले!
जळगावच्या दौ:यावर आलेले खडसे यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास ‘ओ तुनी माय’ या अहिराणी चित्रपटाचा शुभारंभ एका वातानुकूलित मल्टीप्लेक्समध्ये झाला. तब्बल दीड तास खडसे या अहिराणी चित्रपटाच्या शोमध्ये उपस्थित होते. शनिवारी पहाटे खडसे मलकापुरात आले. तेथून ते आपल्या मुक्ताईनगर या मतदारसंघात पोहोचले. मुक्ताईनगर येथून सकाळी ते जळगावात पोहोचले होते. त्यांनी अधिकारी व इतरांची भेट घेतली. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाच्या महिला पदाधिकारी गीतांजली ठाकरे यांच्या निमंत्रणावरुन खडसे या चित्रपटाला उपस्थित राहिले. खान्देशातील बहुसंख्य अहिराणी भाषा भागात बोलली जात असल्याने त्या भाषेतील चित्रपट प्रथमच जळगावातील मल्टिप्लेक्समध्ये लागल्याचा प्रचार निर्माते व वितरकांनी केला होता. निर्मातेदेखील स्थानिक असल्याने त्यांनी खडसे यांना चित्रपटासाठी आग्रह केला. खडसे यांनी दीपप्रज्वालनाद्वारे शोचे उद्घाटन केले. कलावंतांचे कौतुक करून हा चित्रपट करमुक्त करण्याची घोषणा केली. (प्रतिनिधी)
हा चित्रपट सावकारी, हुंडाबळी, हगणदारीबाबत जनजागृती करतो. शासनाच्या योजनांचा या चित्रपटातून प्रसार करण्यात आला आहे.उलट हा चित्रपट करमुक्त व्हावा यासाठी शासनाकडे शिफारस करणार आहे. मी नशिराबाद येथे पीक पाहणीदेखील केली. पंचनाम्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. हा चित्रपट काँग्रेसच्या नेत्यांनीदेखील पाहावा. या चित्रपटासंबंधी माङयावर टीका करणारे समाज सुधारणा व अहिराणी भाषेचे विरोधक आहेत. - एकनाथ खडसे, महसूलमंत्री.
काँग्रेसची टीका
जळगाव जिलसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपला जात असताना महसूल मंत्री एकनाथ खडसे हे संपूर्ण प्रशासनासह चित्रपटाचा आनंद घेत आहेत. हे चित्र शासनाची असंवेदनशीलता स्पष्ट करणारे आहे. खडसे यांनी गारपीटग्रस्त शेताची पाहणी करून, शेतक:यांच्या भेटी घेऊन त्यांच्या मदतीसाठी प्रशासकीय कार्यवाहीला गती द्यायला हवी होती. पण त्यांनी चित्रपट पाहणो पसंत केले. ही कृती अनास्था दाखविणारी आहे.
- सचिन सावंत, प्रवक्ते, प्रदेश काँग्रेस
प्रशासनही मश्गूल
फक्त खडसेच नव्हे तर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.जालींदर सुपेकर, आमदार सुरेश भोळे, आमदार डॉ.गुरूमुख जगवानी हेदेखील या चित्रपटाच्या शो मध्ये होते. एकीकडे गारपीट आणि दुसरीकडे महसूल, मदत व पुनर्वसन मंत्र्यांची महत्त्वाच्या वेळी चित्रपटाच्या शो मध्ये उपस्थिती यासंबंधी शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटला.