- जमीर काझीमुंबई - राज्यातील संभाव्य देशविघातक कृत्ये व समाजकंटकांना वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी राज्य गुप्तवार्ता विभागाने आपले जाळे (नेटवर्क) अधिक भक्कम करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी रॉ, आयबी यांसारख्या गुप्तचर संस्थांमधून सेवानिवृत्त झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांना ‘एसआयडी’मध्ये काम करण्याची संधी दिली जाणार आहे.गुप्त माहिती काढण्याबरोबर कामातील अचूकतेसाठी गुणवत्ता व अनुभवाची आवश्यकता असल्याने अनुभवी ज्येष्ठ अधिकाºयांची भरती केली जाणार आहे. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक व औरंगाबाद या महानगरांमध्ये १० अधिकाºयांची करार पद्धतीने पोस्टिंग केली जाईल, असे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.२६/११ हल्ल्यानंतर ‘एसआयडी’च्या कार्यपद्धतीत बदल केला जात आहे. आधुनिकीकरणासह आवश्यक सामग्रीची सज्जता केली जात आहे. मात्र अतिरेकी संघटना, कार्यकर्ते, घातपाती कटांबाबत अचूक माहिती मिळविण्यासाठी अनुभवी अधिकाºयांची कमतरता असल्याने इंटेलिजन्स ब्यूरो, रॉ, एसआयडीत काम केलेल्या अधिकाºयांची एक वर्षाच्या करार पद्धतीने भरती करण्याचा निर्णय राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त संजय बर्वे यांनी नुकताच घेतला आहे.शिक्षा न झालेल्या अधिकाºयांना प्राधान्यसंबंधित अधिकाºयाला सेवा कालावधीत आयबी, रॉ किंवा एसआयडीमध्ये काम करण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. प्रतिनियुक्तीवर काम केलेल्यांनाही संधी मिळणार आहे. मात्र त्यांच्याविरुद्ध कसलीही विभागीय, प्राथमिक चौकशी प्रलंबित नसणे किंवा शिक्षा झालेली नसणे गरजेचे आहे.अधिकाºयाची वयोमर्यादा ६५ वर्षांपर्यंत आहे. मात्र तो शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. त्यांची एक वर्षाच्याकरार पद्धतीने नियुक्ती केली जाईल. सुरुवातीला १२ महिन्यांसाठी नियुक्ती केली जाणार असून त्यानंतर विभागाला आवश्यकता वाटल्यास आणि त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता कायम राहिल्यास पुनर्नियुक्तीसाठी विचार केला जाईल.आॅनलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या संबंधित उमेदवारांची मुलाखत घेऊन नियुक्ती निश्चित केली जाईल. अनुभवी अधिकाºयांची गुप्तवार्ता विभागाच्या मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद व नाशिक विभागात एकूण १० पदे भरली जातील.
गुप्तवार्ता विभागाला हवेत रॉ, आयबीचे निवृत्त अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 5:28 AM