पुणे : राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ गुरुवारी सर्वात जास्त तापमान अकोला येथे ४१अंश आणि सर्वात कमी अहमदनगर येथे १५़२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ पुढील दोन दिवसात तापमान ४० अंशावर जाईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्राबरोबरच हरियाणा, छत्तीसगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि राजस्थानच्या काही भागामध्ये कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ विदर्भासहीत खान्देशात उन्हाळा तीव्र झाला आहे. जळगावकरांना सकाळी दहापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागातही अशीच परिस्थिती आहे. प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ३७़७, जळगाव ३९़२़, कोल्हापूर ३७़९़, महाबळेश्वर ३३़, नाशिक ३८़१, सांगली ३८़४, सातारा ३७़६, सोलापूर ३९़६, मुंबई ३१़४, अलिबाग ३१़१, रत्नागिरी ३३़५, पणजी ३२़८, डहाणु ३१़९, औरंगाबाद ३८़४, परभणी ३९़५, बीड ३९, अकोला ४१, अमरावती ३९़६, बुलढाणा ३८़६, चंद्रपूर ४०, गोंदिया ३९़२, नागपूर ४०़६, वर्धा ४०़५, यवतमाळ ३९़ (प्रतिनिधी)
राज्यात उन्हाची तीव्रता वाढली
By admin | Published: March 24, 2017 1:44 AM