- जयंत धुळप अलिबाग : योगाच्या माध्यमातून मानसिक ताणतणाव खात्रीने दूर होऊ शकतो, हे सूत्र विचारात घेऊन योग शिक्षक पवार यांनी अलिबाग येथील हिराकोट जिल्हा कारागृहातील कैद्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सन २००४ मध्ये केला. ३ हजारांपेक्षा अधिक कैद्यांनी त्यांच्याकडून मोफत योग प्रशिक्षणाचा लाभ घेतला.निकम गुरुजींनी १९६५ मध्ये सुरू केलेल्या अंबिका योग कुटीरच्या माध्यमातून गेल्या ५३ वर्षांत लाखो नागरिकांनी योग आत्मसात करून, आपले आयुष्य सुखकर आणि निरोगी बनविले असल्याचे योग शिक्षक पवार यांनी सांगितले.>योग ही विनाखर्चीक उपचार पद्धतीआजच्या अत्यंत ताणतणावाच्या युगात मधुमेह, रक्तदाब, पाठदुखीसारखे आजार माणसाला जडतात आणि त्यांचा विपरित परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होतो. या समस्येवर मात करण्याकरिता योग हा विनाखर्चाचा, आपल्याला आपल्या घरी वा आपण जेथे असू तेथे करता येऊ शकणार आणि खात्रीने प्रभावी उपाय असल्याचे पवार यांनी सांगितले.>योगातून बुद्धिमत्तेचा होतो विकासयोगाचे महत्त्व आणि सामर्थ्य शालेय जीवनातच विर्द्यांथ्यांना लक्षात आणून दिले, तर त्यांचा लाभ त्यांच्या बुद्धिमत्ता विकासाकरितादेखील होऊ शकतो, असा विचार डोक्यांत घेऊन, सन १९९९ पासून योग शिक्षक वीरेंद्र पवार यांनी यांनी आपल्या सहकार्यांच्या सहयोगातून, नागाव, हाशिवरे, चोंढी, रेवदंडा आदी ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांकरीता योग प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले आहे. आजवर पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना हे योग प्रशिक्षण मोफत देण्यात आले आहे.>२१ वर्षांत पाच हजार अलिबागकर झाले योगमयतब्बल २१ वर्षांच्या या अलिबागमधील मोफत योग प्रशिक्षणवर्गाचा ६१वा वर्ग रविवारी त्याच नेहमीच्या उत्साहात सुरू झाला आहे. गेल्या २१ वर्षांच्या कालखंडात अलिबागमधील या मोफत योग प्रशिक्षण वर्गांतून पाच हजारपेक्षा अधिक स्त्री-पुरुष नागरिकांनी योग प्रशिक्षण घेऊन, आपले आयुष्य समृद्ध केले असल्याची माहिती अंबिका योग कुटीर अलिबाग शाखेचे प्रमुख व्रतस्थ योग शिक्षक वीरेंद्र पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
International Yoga Day 2018 : ...अन् ३ हजार कैदी झाले योगमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 2:36 AM