मुंबई : सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन ताणतणाव, काळजी, अस्वास्थ्य, असंतुलन, अतृप्ती, भीती यांनी वेढलेले आहे. या समस्या सोडविण्यासाठी ‘योग’ ही गुरुकिल्ली आहे, असे म्हणता येईल. योग म्हणजे शारीरिक कसरत नाही किंवा चमत्कार, गूढविद्यादेखील नाही. जीवनातील समस्या सोडविण्याची ही गुरुकिल्ली आहे, असे मत योग प्रशिक्षक व वैद्यकीय तज्ज्ञांनी ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’च्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.योगाचे महत्त्व पटवून देताना योग प्रशिक्षक कमल कुरेशी यांनी सांगितले की, वर-वर योग हा व्यायाम दिसत असला, तरी त्यातून शरीर आणि मनावर होत असलेला परिणाम निश्चितच जाणवतो. त्यासाठी आवर्जून दिवसात अर्धा तास का होईना, वेळ काढणे आवश्यक आहे.मानसोपचारतज्ज्ञ डॉ.रौनक शेख यांनी सांगितले की, योगशास्त्र मुख्यत: मानसिक आहे, शारीरिक नाही. म्हणून योग म्हणजे केवळ योगासने नाही. योगासने ही केवळ एक पूर्वतयारी आहे. शरीर हट्टाने काबूत आणणे, त्यानंतर मन काबूत आणणे याला ‘योग’ म्हणता येईल. मन आणि मेंदू हे एकच असते, योग करण्यासाठी, तसेच नवे शिकण्यासाठी तरुणच असायला हवे असे नाही, मेंदू कोणत्याही वयात नव्या गोष्टी आत्मसात करू शकतो. नियमित आणि योग्य योग साधनेमुळे शारीरिक क्षमता वाढते, मानसिक स्थिरता, भावनिक शांतता, व्याधी विरहित शरीर, स्मृती वाढते, आत्मविश्वास, तणावाचे व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास, औषधमुक्ती, समाधानी वृत्ती, स्वभाव परिवर्तन, मानसिक संतुलन, आध्यात्मिक प्रगती, आत्मिक उन्नती, सकारात्मक दृष्टीकोन, अथक उत्साह असे अनेक फायदे आहेत. मात्र असाध्य रोग, संसर्गजन्य रोग याबाबत योगोपचाराला मर्यादा पडतात. एखाद्या अनुभवी योग शिक्षकाच्या मार्गदर्शनानुसार नियमित योगसाधना केली पाहिजे, असे मत योग प्रशिक्षक राम योगी यांनी व्यक्त केले.>शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावायोग साधनेची मुळे आचरणात आणण्यासाठी या विद्येचा शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हायला हवा. जेणेकरून, त्याची वेगळी अशी सवय लागण्याची गरज भासणार नाही. लहानग्या वयातच मुलांना या विद्येचे महत्त्व पटेल आणि हा वारसा उत्तरोत्तर जपला जाईल. शिवाय, सध्याच्या डिजिटल युगाचा योग विद्येचा प्रसार करण्यासाठी वापर करणे उपयुक्त ठरेल.- डेव्हीड डिसूजा, ज्येष्ठ योग प्रशिक्षकयोग करताना निवडलेली जागा मोकळी, हवेशीर आणि स्वच्छ असावी. प्रकाश मंद असावा. उष्ण प्रकाश नको. ओलसर भिंती, जमीन नको. ही जागा गोंगाटाच्या ठिकाणी नको. तेथे निरव शांतता असावी.
International Yoga Day 2018 : नियमित ‘योग’ बदलेल मानवाचे आयुष्य, जीवनातील समस्या सोडविण्याची गुरुकिल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 2:39 AM