लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली - केंद्र सरकारच्या ‘भारतनेट’ या उपक्रमाच्या दुस-या टप्प्यातील कामासाठी महाराष्ट्राला २, १७१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दुस-या टप्प्यात राज्यातील १४८ तालुके इंटरनेटने जोडण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान तसेच दूरसंचार मंत्रालयातर्फे दिल्लीत विज्ञान भवन येथे भारतनेटच्या दुस-या टप्प्यातील ब्रॉडबँड नेटवर्कच्या विस्ताराविषयी सोमवारी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या परिषदेला माहिती- तंत्रज्ञान राज्यमंत्री राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही आंमत्रित करण्यात आले होते.दिल्लीतील त्या परिषदेसंदर्भात झालेल्या ठरावाची चव्हाण यांनी मंगळवारी रात्री माहिती दिली. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद, केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद पार पडली. भारतनेटअंतर्गत आॅप्टिकल फायबर नेटवर्कवर ब्रॉडबँडचे जाळे निर्माण केले जात आहे. ग्रामस्तरावरील नागरिकांना डिजिटल सेवा देऊन त्यांना जगाशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने हा उपक्रम सुरु केला. त्याला चांगले यश मिळत असून नागरिक या सुविधेमुळे समाधानी आहेत. त्यामुळे अल्पावधीतच पहिल्या टप्याचे काम संपले, त्याच वेगाने दुस-या टप्प्यातील कामांचा शुभारंभ करण्यात आला. केंद्राच्या वेगवान विकासाच्या योजनेत राज्यातील १४८ तालुके ब्रॉडबँडशी जोडण्यात आल्याचे समाधान असल्याचे चव्हाण म्हणाले.भारतनेटच्या पहिल्या टप्प्यात देशातील एक लाखापेक्षा अधिक ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरने जोडण्यात आल्या आहेत.त्यात महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात एकूण ७४५१ गावामध्ये ब्रॉडबँड नेटवर्क सेवा पोहोचवण्यात आली. तर दुस-या टप्यात राज्यातील १४८ तालुके आणि १ लाख ३८ हजार गावांचा समावेश करण्यात येणार आहे.
दिल्लीत इंटरनेट नेटवर्क विस्तार परिषदेत ठराव:राज्यातील १४८ तालुक्यांना मिळणार ‘भारतनेट’ इंटरनेट सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 10:20 AM
लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली - केंद्र सरकारच्या ‘भारतनेट’ या उपक्रमाच्या दुस-या टप्प्यातील कामासाठी महाराष्ट्राला २, १७१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दुस-या टप्प्यात राज्यातील १४८ तालुके इंटरनेटने जोडण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान तसेच दूरसंचार मंत्रालयातर्फे दिल्लीत विज्ञान भवन येथे भारतनेटच्या दुस-या टप्प्यातील ब्रॉडबँड नेटवर्कच्या विस्ताराविषयी सोमवारी राष्ट्रीय ...
ठळक मुद्दे २ हजार १७१ कोटी रुपयांचा निधी राज्यासाठी मंजूरमाहिती- तंत्रज्ञान राज्यमंत्री राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही आंमत्रित करण्यात आले होते