गेल्या 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि राजकीय घडामोडींमध्ये रखडलेली कामे उरकून घेण्यासाठी राज्यभरातील अनेकांनी मंत्रालयात धाव घेतली. परंतू, मंत्रालयाच येताच या लोकांना इंटरनेट बंद असल्याने प्रवेश मिळत नाहीय. गेल्या तासाभरापासून हे लोक रांगेत खोळंबलेले आहेत.
गेल्या तासाभरापासून मंत्रालयातील इंटरनेट बंद पडलेले आहे. यामुळे राज्यभरातून कामानिमित्त आलेली लोकांचा खोळंबा झाला आहे. साडेदहा वाजल्यापासून पास मिळत नसल्याने रांगेत थांबलेले आहेत.
आज रक्षाबंधन असले तरी नुकताच शपथविधी झाल्याने तसेच मोठी सुटी लागणार असल्याने आज मंत्रालयात काम सुरु ठेवण्यात आले आहे. यामुळे लोकांची रीघ लागलेली आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना आतमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पास दिला जातो. हा पासच तांत्रिक बिघाडामुळे मिळत नसल्याने खोळंबा झाला आहे. बीड, रायगड, नागपूर अशा भागातून नागरिक आले आहेत. रक्षा बंधन असल्याने पटकन काम आटोपून त्यांना गावी निघायचे आहे. परंतू, इंटरनेट सेवा बंद असल्याचे कारण दिले जात असल्याने ताटकळावे लागत आहे.