नाशिक : राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब आहे़ या प्रकारच्या गुन्ह्यांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी पोलीस कुटुंबीय व निवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांकडे शुक्रवारी मूकमोर्चाद्वारे केली आहे़ पोलिसांवरील वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ पोलीस बॉइज संघटना, सेवानिवृत्त पोलीस कल्याण प्रतिष्ठान संघटना, निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या वतीने पोलीस मुख्यालयापासून शिस्तबद्ध पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला़ या मोर्चामध्ये पोलीसपत्नी आपल्या लहान मुलांसह सहभागी झाली होते़ >पोलिसांवर हल्ला करणाऱ्या तिघे ताब्यातभद्रकाली पोलीस ठाण्यातील बिट मार्शलवर हल्ला करणाऱ्या तिघा संशयितांना शुक्रवारी ताब्यात घेतल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ यांनी दिली़ यात दोन अल्पवयीन आहेत. तर तिसऱ्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.गुरुवारी रात्री ठाकरे गल्लीत तीन युवकांमध्ये वाद सुरू होता.याची माहिती विजय मोरे यांना मिळताच त्यांनी भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला़ मात्र, यातील एकाने मोरे यांना लाकडी दांडुक्याने मारहाण केल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले.>कर्तव्यावरील पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना जामीन दिला जाऊ नये़ कारण हल्लेखोरांना त्वरित जामीन मिळत असल्याने पोलिसांवर हल्ला केला तरी आपले काहीही होत नाही असा समाजामध्ये गैरसमज पसरतो़- माधवी सारंगधर, पोलीस कुटुंबीयआमच्या कुटुंबातील सदस्य जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत काळजी लागून राहते़ त्यामुळे अशा हल्लेखोरांना कायद्याने कडक शिक्षा होत नाही तोपर्यंत अशा घटनांना आळा बसणार नाही़ - शिल्पा पांडव, पोलीस कुटुंबीय>पोलीसही एक नागरिक असून त्यालाही स्वसंरक्षणाचा अधिकार आहे़ पोलिसांना संरक्षणासाठी रिव्हॉल्व्हर देण्यात यावे़- रावसाहेब पोटे, अध्यक्ष, निवृत्त पोलीस कल्याण प्रतिष्ठान, नाशिक जिल्हा
हल्ल्यांचा मूक मोर्चाद्वारे निषेध
By admin | Published: September 10, 2016 4:49 AM