शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

सुप्रीम कोर्टाच्या नियंत्रणाखाली मालेगाव स्फोटाचा तपास करा

By admin | Published: May 17, 2016 3:09 AM

सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा फेरतपास होण्याची मागणी काँग्रेस व राष्ट्रवादीने संसदेत केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले

अहमदनगर : सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा फेरतपास होण्याची मागणी काँग्रेस व राष्ट्रवादीने संसदेत केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. केंद्र शासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या ‘एनआयए’च्या विश्वासार्हतेला धक्का बसला आहे. दिवंगत हेमंत करकरे यांच्यासारख्या चांगल्या अधिकाऱ्याने केलेला तपास चुकीचा ठरविण्याचा प्रयत्न होत आहे, असे मतही त्यांनी मांडले. दुष्काळग्रस्तांना राज्य शासनाची मदत होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य शासन दुष्काळ निवारण उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नाशिक, पुणे, मुंबईसारख्या शहरांनाही पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक गावांना २० दिवसांनंतर पिण्याचे पाणी मिळत आहे. केंद्रात आघाडीचे सरकार असताना ते दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठिशी होते. ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. आताच्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घ्यायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. नगरचे माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले यांच्या निधनानंतर घुले कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पवार सोमवारी नगरला आले होते. (प्रतिनिधी)>तपासातील निष्कर्ष जाहीर करा : प्रकाशमुंबई : तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी केलेल्या तपासाचे निष्कर्ष जाहीर करावेत, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले, करकरे हयात असताना त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी केलेल्या तपासावर भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतले होते. त्यासंदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेतली होती.मनमोहन सिंग यांनी तपास अधिकाऱ्यांसह तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना अडवाणींच्या निवासस्थानी पाठवून या चौकशीत समोर आलेल्या गंभीर बाबी अवगत केल्या होत्या. वस्तुस्थिती लक्षात आल्यामुळे अडवाणी यासंदर्भात एका शब्दानेही कधी बोलले नाहीत. आज करकरेंच्या तपासावर आक्षेप घेतले जात असताना अडवाणींनी मौन न बाळगता त्यावेळी त्यांच्यासमोर कोणते तथ्य आले होते, ते जाहीर करावे, अशी अपेक्षा मोहन प्रकाश यांनी व्यक्त केली.मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची माहिती देण्यासाठी करकरे यांनी मोहन भागवत यांची भेट घेतली होती. एवढेच नव्हे तर संबंधित संघटनेकडून सरसंघचालक भागवत यांच्या जीवालाही धोका असल्याचेही करकरे यांनी या भेटीमध्ये सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात सरसंघचालकांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. भागवतांनी त्यांची करकरेंशी भेट झाली होती की नाही, ते जाहीर केले पाहिजे अशीही मागणी मोहन प्रकाश यांनी केली.