शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
2
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
3
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
4
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
5
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
7
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
8
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
9
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
10
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
11
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
12
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
13
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
14
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
15
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
16
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
17
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
18
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
19
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
20
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 

रस्ते घोटाळाच नव्हे तर वाट्टेल त्याची चौकशी करा : उद्धव ठाकरेंचा टोला

By admin | Published: July 24, 2016 3:19 AM

मुंबईतील रस्ते घोटाळ्याबाबत पहिले पत्र महापौरांनी दिले होते. आम्ही पैसे खाणारे असतो तर हे पत्र त्यांनी दिले असते का? रस्ता, नालेसफाई घोटाळा किंवा आणखी काय काय वाट्टेल त्याची

मुंबई - मुंबईतील रस्ते घोटाळ्याबाबत पहिले पत्र महापौरांनी दिले होते. आम्ही पैसे खाणारे असतो तर हे पत्र त्यांनी दिले असते का? रस्ता, नालेसफाई घोटाळा किंवा आणखी काय काय वाट्टेल त्याची चौकशी करा. शिवसेना कुठल्याही चौकशीत सापडणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केले.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा रंगशारदा सभागृहात झालेल्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मुंबईतील रस्ते दुरूस्तीच्या घोटाळ्याबाबत विरोधकांसह भाजपाच्या आमदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचा उल्लेख न करता त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ‘महापालिका असेल, केंद्र किंवा राज्य सरकार असेल. जिथे जे काही पटत नाही त्यावर बोलत राहणारच. जिथे महापालिका चुकते तिथे आपण सडकून काढू. पण महापलिका किती काम करते याचे कधी कोणी कौतुक करीत नाही, याचे मला नेहमी शल्य राहिले आहे. यंदा भरपूर पाऊस होऊनही कोठेही पाणी तुंबलेले नाही. ते चांगले काम झाले. पण आता यांना खड्डे दिसायला लागले. काही वेळा असे वाटते पाणी तुंबलेले बरे की काय, त्यामुळे खड्डे नाही दिसत. जिथे चूक आहे तिथे आहेच. लगेच त्यात काही घोटाळा आहे, असा आरोप केला जातो. सध्या चौकशीचे फॅड आले आहे, ठिक आहे, करा वाट्टेल त्याची चौकशी करा. शिवसेनेला त्याची पर्वा नाही. कारण एकाही खोट्या पैशाचे काम शिवसेनेने केलेले नाही.गणेशोत्सव मंडळांवर अनावश्यक बंधने लादली जात असल्याचे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘उत्सव आपण इथे साजरे करायचे नाही तर काय पाकिस्तानात साजरे करायचे का? उत्सव म्हटल्यावर थोडे इकडे तिकडे होतेच. समजून घेतले पाहिजे. सर्व गणेश मंडळे आपली आहेत. त्यांना मी शिवसैनिक समजतो. यात राजकारण आणायचे नाही म्हटले तरी एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे, की सामाजिक भान असलेला शिवसेना एकमेव पक्ष आहे. निवडणुकीच्या तोंडावर मंडळे विकत घेण्याचा प्रयत्न होतो. पण आमची मंडळे आमच्याकडेच आहेत. कोणी ती विकत घेऊ शकत नाहीत. मंडळांनी काळजी क^रू नये. कुठल्याही अडचणी आल्या तर शिवसेना पाठीशी असेल. गणेश मंडळांवर इतकी बंधने का लादतात समजत नाही.’ नागरिकांना इतर पक्षांपेक्षा शिवसेना जवळची वाटते. एका विश्वासाने आपल्या सोबत राहिली आहे. तो सार्थकी ठरविण्याचे काम सेनेने चार वेळा केले आहे आणि येत्या फेब्रुवारीत पाचव्यांदा करणार असून त्याची मोठी जबाबदारी शिवसैनिकांवर आहे. आयुक्तांनी खूप छान समजावले की डेंग्यू कसा होतो. नाही तर एखाद्दुसरी केस सापडली तर सुरू होईल महापालिकेत डेंग्यू घोटाळा. कुणाला काही कळते की नाही माहीत नाही. पण उचलली जीभ लावली टाळ्याला, असा प्रकार विरोधकांकडून सुरूआहे, अशी टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)