मुंबई : बनावट कागदपत्राच्या आधारे आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय असलेल्या ठिकाणची सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) देशभरातील छापेमारीची कारवाई रविवारी पहाटे पूर्ण झाली असून, आता त्यामध्ये सापडलेल्या ऐवजाबाबतची छाननी केली जात आहे. विविध कंपन्यांच्या नावे असलेले दस्तावेज, शेअर्स बाँड आदी कागदपत्रांची तपासणी केली जात असून, त्यातून कोट्यवधीचा अपहार उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शनिवारच्या छाप्यांच्या सत्रातून मिळालेल्या माहितीबाबत ईडी गेल्या वर्षभरापासून तुरुंगात असलेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे लवकर आणखी चौकशी केली जाणार आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. जगदिश पुरोहित या सीएमार्फत त्यांनी कोट्यवधींची रक्कम विविध कंपन्यांच्या नावे गुंतविल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. (प्रतिनिधी)
ईडीकडून तपासणी सुरूच
By admin | Published: April 03, 2017 5:56 AM