अरुण बारसकर, सोलापूरराज्यातील काही मल्टिस्टेट सोसायटींबाबतच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने सर्वच २६१ मल्टिस्टेटची तपासणी करण्याचे आदेश सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिले आहेत. फेब्रुवारीअखेरपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना निबंधकांना दिल्या आहेत.केंद्रीय निबंधकांनी मल्टिस्टेट सोसायटी (बहुराज्य सहकारी संस्था) अधिनियम २००२नुसार राज्यात मल्टिस्टेट काढण्यास परवानगी दिली. हा.. हा.. म्हणता राज्यात मल्टिस्टेट सोसायट्या स्थापन झाल्या. राज्यात अशा सोसायट्यांची संख्या २६१ इतकी आहे. राज्यात या संस्था नसल्या तरी काही जिल्ह्यांतच यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. राज्यातील काही मल्टिस्टेट स्थापन झाल्या व बंदही पडल्या. यात अनेकांचा पैसा गुंतला आहे. सोसायट्यांबाबतच्या तक्रारींची चौकशी केली असता तक्रारीत तथ्य आढळले. यामुळेच हे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)
मल्टिस्टेट सोसायटींची होणार तपासणी
By admin | Published: February 02, 2016 4:03 AM