मुंबई : बारा ते चौदा महिन्यांत गुंतवणूक तिपटीने करण्याच्या योजनेद्वारे शहरातील नामांकित डॉक्टरांसह पोलीस अधिकाऱ्यांना कोट्यवधींना गंडा घालणाऱ्या कार्तिक मोहनप्रसाद श्रीवास्तव या महाठगाला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेविरोधी विभागाने अटक केली. २0१३ ते २0१४ या कालावधीत श्रीवास्तव कुटुंबीयांनी अनेक कंपन्या सुरू करून, त्याद्वारे गुंतवणुकीची रक्कम अल्पावधीत तिपटीने परत करण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून अनेक डॉक्टर, पोलीस अधिकारी आणि व्यावसायिकांनी या कंपन्यांमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली होती. राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन आणि खासदार हुसेन दलवाई यांनी पाठपुरावा केल्यानंतर उपराष्ट्रपती कार्यालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबत कारवाईची लेखी सूचना केली होती. त्यानंतर, पोलिसांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)
गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणारा अटकेत
By admin | Published: March 02, 2017 5:47 AM