शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरक्षित, लाभदायक

By admin | Published: May 14, 2017 12:43 AM

देशात उद्योग-व्यवसाय वाढत असताना लोकांची मिळकतही वाढली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशात उद्योग-व्यवसाय वाढत असताना लोकांची मिळकतही वाढली आहे; मात्र अर्थव्यवस्थेतील चढ-उतारामुळे नागरिकांमध्ये जीवनातील गरजा पूर्ण करण्याबाबत चिंता पसरली आहे. घामाचा पैसा कुठे गुंतविल्याने अधिक लाभ मिळेल, हा प्रश्न आहे. अशावेळी म्युच्युअल फंड हा सर्वाधिक सुरक्षित, लाभदायक आणि विश्वासकारक गुंतवणुकीचा पर्याय असल्याचे प्रतिपादन म्युच्युअल फंड तज्ज्ञ सचिन जोगळेकर, अरविंद परांजपे आणि आणि रिलायन्स इनव्हेस्टर गाइडन्सच्या रिस्क मॅनेजमेंटचे हेड मिलिंद नेसरीकर यांनी केले. लोकमत आणि रिलायन्स म्युच्युअल फंडच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तुमच्या ‘आर्थिक यशाची गुरुकिल्ली’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. ते म्हणाले, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात स्वत:चे घर, मुलांचे शिक्षण, कारची खरेदी आणि देश-विदेशात पर्यटन करण्याचे स्वप्न असते. कमी वेळात अधिक लाभ मिळेल, अशा ठिकाणी घामाचा पैसा गुंतविण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. सामान्यपणे बँक एफडी, रिअल इस्टेट, सोनेखरेदी, शेअरमार्केट, विमा, म्युच्युअल फंड आदी पर्याय गुंतवणुकीसाठी निवडले जातात. सुवर्णखरेदी किंवा रिअल इस्टेट क्षेत्र अस्थिर असल्याने या ठिकाणी गुंतवणूक करणे लाभदायक ठरताना दिसत नसून यातून मिळकत मिळेल याचा भरवसा नाही. दुसरीकडे बँकेत पैसा ठेवणे सुरक्षित असले, तरी मिळणाऱ्या व्याजापेक्षा महागाई अधिक वाढत असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याबाबत अनुभव असणे अत्यावश्यक आहे. मात्र, हे गुंतागुंतीचे क्षेत्र असल्याने सामान्य नागरिकांना ते सहज शक्य नाही. विम्याचे क्षेत्रही तेवढे व्यापक आणि लाभदायक नाही. अशा परिस्थितीत केवळ म्युच्युअल फंड असे क्षेत्र आहे, ज्यामध्ये गुंतवणूक केल्याने अधिक लाभ आणि तुमच्या पैशाला स्थायित्व मिळू शकते. याठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी व्यक्ती अनुभवी असणे गरजेचे नाही किंवा कमीतकमी पैशाची सीमा नाही. म्युच्युअल फंडवर भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्डाचे (सेबी) नियंत्रण असते. म्युच्युअल फंड विविध प्रकारात उपलब्ध असून, एकमुस्त किंवा थोड्या पैशातही फंड खरेदी केले जाऊ शकतात. डेब्ट फंड, इक्विटी आणि एसआयपी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत. पैसा गुंतविल्यानंतर संबंधित कंपनीचे अनुभवी फंड मॅनेजर गुंतवणूकदारांचा पैसा योग्य ठिकाणी खर्च करतात व यातून मिळणारा फायदा गुंतवणूकदारांनाच मिळतो. चांगला फायदा मिळविण्यासाठी नागरिकांनी धैर्य ठेवावे, असे आवाहन शर्मा यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मेघना झुझम यांनी केले.उपस्थितांच्या प्रश्नांचे समाधानकार्यशाळेच्या वेळी नागरिकांनी तज्ज्ञ मान्यवरांना म्युच्युअल फंडशी संबंधित प्रश्न विचारले. मान्यवरांनीही अतिशय विस्तारपूर्ण उत्तरे दिली. म्युच्युअल फंडचे प्रकार, लाभाची मर्यादा, कालावधी आदी शंकांचे या वेळी समाधान झाले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला, पुरुष व युवक उपस्थित होते.‘म्युच्युअल फंड डे’ प्रत्येक महिन्याच्या ७ला रिलायन्सच्या वतीने अशी घोषणा करण्यात आली आहे की, प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला ‘म्युच्यअल फंड डे’ साजरा करण्यात येणार आहे.