अकोला : सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसेच नसल्याने शासन (एनपीए) दिवाळखोरीत निघाले असून या सरकारला हद्दपार करण्यासाठी येत्या निडणुकीत समविचारी राजकीय पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी स्थापन करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले.आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी वºहाडात ठिकठिकाणी काँगे्रसचे मंथन शिबिर होत असून, रविवारी अकोला येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, मतांचे विभाजन टाळण्यासाठी राज्यातील समविचारी पक्षांची मोट बांधण्यात येत असून, शिवसेना व महाराष्टÑ नवनिर्माण सेना वगळता सर्वच पक्षांना सोबत घेणार आहोत. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनाही या महाआघाडीत येण्याचे निमंत्रण दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.अॅड. आंबेडकरवरिष्ठांशी बोलतीलमताचे विभाजन टाळण्यासाठी आम्ही भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहोत. तथापि, त्यांना आमच्याशी याबाबत चर्चा करायची नसेल तर कदाचित ते वरिष्ठांसोबत चर्चा करतील, असे चव्हाण यांनी सांगितले....तर ही अखेरची निवडणूक !भाजपा सरकार आता सत्तेवर आले तर ही देशाची शेवटची निवडणूक असेल, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. अविश्वास प्रस्तावावर चर्चा नको म्हणून केंद्रात अद्याप अविश्वास प्रस्ताव दाखल झाला नाही. राज्यात विधानसभा अध्यक्षाविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याअगोदरच चर्चा टाळण्यासाठी विश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला. हे लोकशाहीचे नव्हे तर हुकूमशाहीचे द्योतक आहे. भाजपाला सर्वधर्म समभाव, संविधान नको असल्याने पुन्हा त्यांचे बहुमत आले तर भारतीय राज्यघटनाच हे बदलतील, असा धोकाही चव्हाण यांनी व्यक्त केला.भयमुक्त,भाजपामुक्त भारतभाजपाची विचारसरणी ही एक विष असून, सर्वसामान्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भय आणि भाजपामुक्त भारत करणे ही काँग्रेसची भूमिका असून, त्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही. त्यानुषंगाने जबाबदारी ओळखून काम करण्याचे आवाहन खा. अशोक चव्हाण यांनी केले.
निवडणुकीसाठी काँग्रेसची महाआघाडी, प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 3:29 AM