शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

आयपीएस अधिकारी शिंदेंनी आरोप फेटाळले

By admin | Published: February 19, 2016 3:22 AM

आयपीएस अधिकारी आर.डी. शिंदे यांनी शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील आपल्यावरील निष्काळजीपणाचे सर्व आरोप आयपीएस अधिकारी आर.डी. शिंदे यांनी फेटाळून लावले आहेत.

डिप्पी वांकाणी,  मुंबईआयपीएस अधिकारी आर.डी. शिंदे यांनी शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील आपल्यावरील निष्काळजीपणाचे सर्व आरोप आयपीएस अधिकारी आर.डी. शिंदे यांनी फेटाळून लावले आहेत. याबाबत आपले म्हणणे त्यांनी लेखी स्वरूपात सरकारला सादर केले आहे. माजी पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी याबाबत सरकारला सादर केलेल्या आपल्या अहवालात म्हटलेले आहे की, आर.डी. शिंदे हे त्या वेळी रायगडचे पोलीस अधीक्षक होते. त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्याने त्यांना याबाबत माहिती दिली होती की, पेणमध्ये एक मृतदेह सापडला आहे. पण, त्यांनी याकडे गांभीर्याने बघितले नाही. याबाबत शिंदे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. संजीव दयाल यांनी याबाबतचा आपला अहवाल २९ सप्टेंबरला सादर केल्यानंतर सरकारने शिंदे यांना याबाबत स्पष्टीकरण मागितले होते. मागील आठवड्यात शिंदे यांनी या प्रकरणी आपले स्पष्टीकरण सादर केले आहे, यात आपल्यावरील निष्काळजीपणाचे आरोप त्यांनी फेटाळले आहेत. २३ मे २०१२ रोजी रायगड पोलिसांना शीनाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. पण, पोलिसांनी याबाबत खून अथवा अपघाताचा कुठलाही गुन्हा दाखल केला नव्हता. तर फक्त पेण येथील स्टेशन डायरीत याची नोंद घेतली होती. या प्रकरणी रायगड पोलिसांच्या भूमिकेबाबत तपास केला जात आहे. चौकशी अधिकाऱ्यांसमोर दिलेल्या स्पष्टीकरणात पोलीस निरीक्षक सुरेश मिरघे यांनी सांगितले आहे की, त्या वेळी त्यांना रायगडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातून एक कॉल आला होता. दुपारी १.५६च्या या फोननंतर आपण शिंदे वापरत असलेल्या मोबाइलवर ८० सेकंद संभाषण केले. मिरघे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे जे बोलणे झाले त्यातून असे समजले की, शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना एक मृतदेह रहस्यमय परिस्थितीत आढळला आहे. तथापि, आपण उपविभागीय पोलीस अधिकारी चव्हाण आणि सहकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली होती की, शिंदे यांना असे निर्देश दिले आहेत की, सापडलेला मृतदेह वैज्ञानिक विश्लेषणासाठी पाठविण्यात यावा. तर त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात यावी. अर्थात पेण पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरीतही याबाबत नोंद आहे की, शिंदे यांना या प्रकरणात कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. मृतदेह सापडल्याबाबत आणि त्यावरील कार्यवाहीबाबत मिरघे यांच्याकडून आपल्याला कोणतेही माहिती दिली गेली नव्हती, असे शिंदे यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात अपघाती किंवा अन्य गुन्हा दाखल करण्याबाबतही आपल्याला निर्देश नव्हते, असेही शिंदे यांचे म्हणणे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतचा अहवाल लवकरच गृह मंत्रालयाला सादर करण्यात येणार आहे. त्यावर गृह मंत्रालय पुढील कार्यवाही करणार आहे.