ठाणे : खंडणी मागितल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या इक्बाल कासकरला त्याची भाची (हसीना पारकर हिची मुलगी) बुधवारी भेटण्यासाठी आली. तिला पाहून तिच्यावर तो चिडला आणि परत येऊ नको, असा सल्ला दिला. या मामा-भाचीच्या पाच मिनिटांच्या भेटीत तो रडल्याची माहिती सूत्रांनी दिली.कासारवडवलीत बिल्डरकडून चार फ्लॅट व ३० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने १८ सप्टेंबर रोजी हसीना पारकर हिच्या नागपाडा येथील घरातून इक्बाल आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. त्यानंतर मटकाकिंग पंकज गंगर यालाहीअटक केली. कासकर याच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात आणखी दोन खंडणीचे गुन्हे दाखल झाले. चौकशीत छोटा शकील याचेनाव पुढे आल्यावर त्याच्यासह कासकर आणि इतर ५ जणांविरोधात संघटित गुन्हेगारी अन्वये क ारवाई केली. अटकेनंतर दिवसेंदिवस कासकरच्या मार्गात अनेक अडचणी वाढू लागल्या.जवळपास महिनाभराच्या कालावधीत कासकर पोलिसांच्या चौकशीस सामोरा जात असताना, तो एकटाच पडला. या वेळी क ोणीही नातेवाईक त्याला भेटण्यासाठीआले नव्हते. त्यातच गेल्या आठवड्यात हसीना पारकर हिची मुलगी ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात अचानक धडकलीहोती. तिने भेटण्याची विनंती केल्यावर मामा-भाचीची भेट घडून आली. अवघ्या पाच मिनिटांच्या भेटीत भाचीला पाहून कासकर अचानक भडकला. तू का आली, असा प्रश्न विचारला. पुन्हा भेटण्यासाठी येऊ नये, असे सांगत भावुक झालेला कासकर पहिल्यांदाच रडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाचीला पाहून इक्बाल कासकर रडला! अवघ्या पाच मिनिटांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 5:20 AM