मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी 26क् अंकांच्या आपटीसह चार आठवडय़ांची नीचांकी पातळी 25,329.14 अंकांवर बंद झाला. सलग तिस:या सत्रत सेन्सेक्समध्ये घट नोंदली गेली.
बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इराकमध्ये काही ठिकाणांवर हवाई हल्ला करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने विक्रीच्या दबावाखाली सेन्सेक्समध्ये ही घट नोंदली. दरम्यान, रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी प्रत्युत्तरादाखल पाश्चिमात्य देशांतून खाद्यपदार्थाची आयात करण्यावर र्निबध लावण्याचा
निर्णय घेतला आहे. अमेरिका आणि युरोपियन संघटनेने युक्रेन मुद्यावरून रशियावर यापूर्वीच र्निबध लादले आहेत.
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया पाच महिन्यांच्या नीचांकी 61.74 पातळीवर गेला, तसेच जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव वाढल्याचाही बाजार धारणोवर नकारात्मक परिणाम झाला.
3क् शेअर्सचा सेन्सेक्स घसरणीसह 25,4क्6.87 अंकांवर उघडला आणि एकावेळी 25,232.82 अंकांर्पयत खाली आला. शेवटी तो 259.87 अंक वा 1.क्2 टक्क्यांच्या घसरणीसह सुमारे चार आठवडय़ांची नीचांकी पातळी 25,329.14 अंकांवर बंद झाला. गेल्या तीन सत्रंमध्ये मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 578.87 अंक वा 2.23 टक्क्यांनी कोसळला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 8क्.7क् अंक वा 1.क्6 टक्क्यांनी घटून 7,6क्क्च्या खाली 7,568.55 अंकांवर बंद झाला. यापूर्वी 15 जुलै रोजी तो 7,526.65 अंकांवर बंद झाला
होता.
जागतिक पातळीवर आशियात हाँगकाँग, जपान, तैवान, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाच्या बाजारात घसरण नोंदली गेली, तर चीनचा बाजार तेजीसह बंद झाला. युरोपीय बाजारातही सुरुवातीला घसरणीचा कल राहिला.
देशी बाजारात सेन्सेक्सवरील 3क् पैकी 24 शेअर्समध्ये घट नोंदली.
सेसा स्टरलाईट, टाटा पॉवर, टाटा स्टील, भेल, गेल इंडिया, हिंदाल्को, लार्सन, अॅक्सिक बँक आणि कोल इंडियाच्या शेअर्सला घसरणीचा फटका बसला; मात्र भारती एअरटेलचा शेअर 2.क्9 टक्क्यांनी मजबूत झाला. (प्रतिनिधी)